मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी आधी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन केला होता. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना सोडा, मी सगळा पक्ष घेऊन येतो अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मी सगळा पक्ष घेऊन भाजपसोबत येतो, तुम्ही मुख्यमंत्री व्हा असे संभाषण उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे आता शिवसेनेत उभी फूट पडल्याचे समोर आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर होणार असल्याचे बोलले जात आहे.
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी यावर प्रतिक्रीया दिली. यावर बोलताना नानिवडेकर म्हणाल्या, शिवसेना (ShivSena) फुटी थांबवण्यासाठी हा प्रयत्न केला असावा. पण भाजपनेही वेळ निघून गेली आहे अस सांगितेल आहे. आम्ही एक वर्ष तुमच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही काही रिप्लाय दिला नाही. आता अचानक शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमध्ये, दोन मोठे नेते एकत्र येणार अस म्हटले आहे, यावरुन आता संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या फोन मधील संभाषणाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात पुढ काय होतय हे पाहणे महत्वाचे आहे. राज्याच्या राजकारणात सातत्याने नवनव्या घडामोडी घडत आहेत. अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली होती. त्यावेळी भाजपचे केंद्रीय नेतृत्व नाराज झाले होते. त्यामुळे भाजपने आता ही वेळ साधली आहे. त्यामुळे आता भाजप आणि उद्धव ठाकरे नजीकच्या काळात जवळ येतील असं मला तर वाटत नाही, असंही ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणाले.
हे देखील पाहा
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला हे मला माहित नाही. पण, महत्वाचे हेच आहे की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे. शिवसेना एक व्हावी. मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनासुद्धा भेटले आहे. इतर आमदार, खासदार आणि कार्यकर्ते यांच्या मनात तेच आहे जे मी बोलते आहे आणि ते होईल, असेही मला वाटते. मी सेनेच्या तिकीटावर लढले. गेली दोन अडीच वर्षे मी पक्षासाठी काम करत आहे. शिवसैनिक म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. उलट आता संजय राऊत यांनीच थोडं शांत राहण्याची गरज आहे, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.