Politics : पालघरमध्ये शिवसेनेचा डॅमेज कंट्रोल; जुन्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा मोठी संधी

Palghar Politics News : पालघर जिल्ह्यातील शिवसेना वाचवण्यासाठी आणि बंडखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने पालघरमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
Palghar Shivsena News
Palghar Shivsena NewsSaam TV
Published On

पालघर: कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. याचा सर्वात मोठा फटका शिवसेनेला (Shivsena) बसला आहे. राज्यभरातील शिवसेनेचे अनेक आमदार, नेते, नगरसेवक आणि शिवसैनिक हे शिंदे गटात सहभागी होत आहे. हा सगळा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेनाही जोरदार प्रयत्न करत आहे. पालघरमध्ये (Palghar) शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांनी पुन्हा संधी देत मोठी जबाबदारी दिली आहे. पालघर जिल्ह्यातील शिवसेना वाचवण्यासाठी आणि बंडखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने पालघरमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. (Palghar Shivsena News)

हे देखील पाहा -

उदय बंधू पाटील आणि
उदय बंधू पाटील आणिरुपेश पाटील उत्तम पिंपळे

पालघरमध्ये शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर नव्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळातील जुन्या शिवसैनिकांना पक्षाकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यात उदय बंधू पाटील यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर तर एकनाथ शिंदे यांचे विरोधक असलेले माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांची पालघर, भिवंडी आणि ठाणे लोकसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वैभव संखे, वसंत चव्हाण आणि पंकज देशमुख या तिघांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वसंत चव्हाण, पंकज देशमुख आणि वैभव संखे
वसंत चव्हाण, पंकज देशमुख आणि वैभव संखेरुपेश पाटील

वसई-विरार महानगरपालिका आणि पालघर पट्ट्यातील विविध नगर पंचायतीमधील एकूण ५० नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शिवसेनेला (ShivSena) ठाणे आणि पालघर पट्ट्यात मोठा फटका बसला आहे.१५ जुलैला शिंदे गटात समाविष्ट झालेल्या नगरसेवकांमध्ये वसई-विरार महानगरपालिकेतील ५ नगरसेवक, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायत समितीतील ५ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी, पालघर जिल्हा परिषदेच्या ५ सदस्यांनी शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.

शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांच्या उपस्थितीमध्येच या नगरसेवकांनी त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता, त्यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. हा सगळा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पालघर जिल्ह्याच्या शिवसेनेत मोठे बदल केले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com