आज शाळेचे नाही तर आपल्या भविष्याचे दार उघडले - उद्धव ठाकरे Saam Tv
मुंबई/पुणे

आज शाळेचे नाही तर आपल्या भविष्याचे दार उघडले - उद्धव ठाकरे

माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - कोरोनाचे Corona निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची School प्रत्यक्ष आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विदयार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचे दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे.   

हे देखील पहा -

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं. आज शाळेचे नाही तर आपल्या भविष्याचे दार उघडले आहे. हे उघडतांना खुप काळजीपुर्वक निर्णय घेण्यात आला आहे असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यानी शिक्षकांना आणि पालकांना आपल्या मुलांची जबादरी घेण्याची विनंती केली. 

पुढे ते म्हणले की, शिक्षकांना बरे वाटत नसेल  तर त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. विद्यार्थ्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. पावसाळा अजून संपला नाही. ऋतू बदलत असतांना साथीचे रोग येत असतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सुर्व्यांनी काम करावे. तसेच शिक्षकांनी काळजी घ्यावी की शिक्षणाची जागा, वर्ग बंदिस्त नसायला हवे. दार, खिडक्या उघड्या असायला हव्या,  हवा खेळती हवी,निर्जंतुकीकरण करतांना देखील काळजी घेणे. तसेच सोशल डिस्टंगिंचे पालन करणे, स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.

कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विदयार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा देतो. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पडली जाईल असा मला विश्वास आहे.  एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT