Arun Goyal Resignation Saam TV
मुंबई/पुणे

Election Commissioner Resigns: निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचे गूढ काय? ठाकरे गटाचा भाजपला थेट सवाल

Arun Goyal Resignation: निवडणूक आयुक्त गोयल यांच्या राजीनाम्याचे गूढ काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून भाजपला विचारण्यात आला आहे.

Satish Daud

Saamana Editorial on Arun Goyal Resignation:

ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे. गोयल यांच्या राजीनाम्याचे गूढ काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून भाजपला विचारण्यात आला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"अरुण गोयल यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. मोदी सरकारनेच त्यांची नियुक्ती केली होती. मग अचानक असे काय घडले की, गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आणि तेवढ्याच तातडीने तो मंजूरही झाला? संपूर्ण देशाला हा प्रश्न पडला आहे", असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

"मोदी राजवटीतील उत्तरे न मिळालेल्या प्रश्नांची यादी न संपणारी आहे. त्यात आता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याची भर पडली आहे. गोयल यांच्या राजीनाम्याचे गूढ काय? हा प्रश्नही मोदी राजवटीतील इतर अनेक संशयास्पद रहस्यांचा भाग बनण्याची शक्यता जास्त आहे", असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलंय.

"मुळात मोदी सरकारने अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून तडकाफडकी केलेली नेमणूक वादग्रस्त आणि अनैतिकही ठरली होती. एक आयएएस अधिकारी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेतो काय आणि दुसऱयाच दिवशी त्याची नियुक्ती निवडणूक आयुक्त म्हणून होते काय? हा सगळाच प्रकार धक्कादायक होता", अशी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली.

"गोयल हे देखील भाजपचे निवडणूक आयोगातील ‘न्या. गंगोपाध्याय’ ठरणार का? ज्यांनी त्यांना ‘अनैतिक’ पद्धतीने पदावर बसवले, त्यांच्याशीच त्यांचे काही ‘नैतिक’ वगैरे मतभेद झाले का? मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या एकटय़ाच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक पार पाडण्याचा मोदी सरकारचा डाव आहे का?", असा सवालही सामना अग्रलेखातून भाजपला विचारण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT