Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या ७ जिल्हाप्रमुखांवर आक्षेप; ठाकरे गटाचा नेमका दावा काय?

उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटातील ७ जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज निवडणुक आयोगासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत खरी शिवसेना आमचीच असा दावा शिंदे आणि ठाकरे गटाकडून करण्यात आला. यावर आयोगासमोर जोरदार युक्तीवाद झाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटातील ७ जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेतला आहे. (Maharashtra Political News)

शिंदे गटाने निवडणूक आयोगामध्ये सादर केलेली कागदपत्रे ही बोगस आहे, असा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला. इतकंच नाही तर, विजय चौगुले यांच्यासह ७ जिल्हाप्रमुखांवरही ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. शिंदे गटाने सादर केलेल्या ७ जिल्हाप्रमुखांच्या कागदपत्राने त्रुटी आहे असा दावा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून करण्यात आला.

दरम्यान, शिंदे गटाचे वकील महेश जेठलानी यांनी ठाकरे गटाचा हा दावा खोडून काढला. शिंदे गटाच्या कागदपत्रात कोणत्याही त्रुटी नाहीत, असं ते म्हणाले. आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाकडून करण्यात आली आहे.

कोणत्या ७ जिल्हाप्रमुखांवर आक्षेप?

- राजाभाई केणी, तालुकाप्रमुख पदावर असताना रायगडचे जिल्हाप्रमुख दाखवले.

- राम चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष,जिल्हा परिषद यांना नंदुरबारचे जिल्हाप्रमुख दाखवले.

- किरसिंग वसावे, माजी परिषद सदस्य असताना नंदूरबारच जिल्हाप्रमुख दाखवले.

- नितीन माते, माजी जिल्हाप्रमुख असताना चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख दाखवले.

- दत्तात्रय साळुंके, जिल्हा समन्वयक असताना धाराशीवचे जिल्हाप्रमुख दाखवले.

- सुरज साळुंखे, युवा सेना राज्य विस्तारक असताना धाराशीव जिल्हाप्रमुख दाखवले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी होणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार हे आता शुक्रवारी कळणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Hindi Sakti : हिंदी सक्तीविरोधात शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल | VIDEO

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

Pune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, त्याच सूटमध्ये २४ तास आधीही रंगली होती पार्टी

नवऱ्याला रेव्ह पार्टीत बेड्या, २४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला

SCROLL FOR NEXT