Marathi Langauge Row  Saamtv
मुंबई/पुणे

Marathi Langauge Row : मुंबईत मराठी माणसाचीच गळचेपी; मराठी असल्यामुळे असोसिएशनचं सभासदत्व नाकारलं, नेमकं काय घडलं? VIDEO

Marathi Langauge Row update : मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनचं सभासदपद न दिल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय. मुंबईतील कार्यालयात जाऊन बोर्डाला काळं फासलंय. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

मराठी भाषेचीच नाही तर मराठी माणसाचीही मुंबईतच गळचेपी होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कधी मराठीवरुन रेल्वे टीसीचं, बुकींग क्लार्कचं मुजोर बोलणं तर कधी सोसायटीच्या अध्यक्षांचं मराठीला नाकारणे अशा घटनांनी मराठी मनांच्या तळपायाची आग मस्तकाला जात आहे.

आता मुंबईतल्याच डायमंड असोसिएशन मराठी माणसालाच सभासदत्व नाकारलं आहे. याशिवाय कार्यालयातील नोटीस बोर्डावर सगळी माहितीही गुजराती आणि इंग्रजी भाषेत आहे.याविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. मराठी माणसांला सभासदत्व न देण्याची हिंमत होतेच कशी ? असा जाब ठाकरे गटानं विचारला आहे.

नक्की काय प्रकार आहे पाहूया...

दि मुंबई डायमंड मर्चंट असोसिएशच्या पंचरत्न गिरगाव ऑपेरा हाऊस या संघटनेचे मुंबईमध्ये 17 हजार सभासद आहेत. यामध्ये फक्त 50 ते 60 सभासद मराठी आहेत. सर्व नियमावली पूर्ण करून देखील सभासदत्व दिलं नाही. काही सभासदांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना मराठी असल्याने सभासत्व देण्यास नकार दिला आहे. 600 जणांनी सभासदासाठी अर्ज केले होते. त्यामध्ये 40 मराठी माणसांनी अर्ज केले होते. पण त्यामध्ये एकही मराठी माणसाला सभासद करून घेतले नाही. नवीन सभासद अर्ज भरण्याकरता जो नियमावली अर्ज बनवला होता तो सुद्धा इंग्लिश आणि गुजराती भाषेत होता.

डायमंड संघटनेच्या कार्यालयात सणांचा उल्लेख असलेल्या बोर्डावर केवळ शिवाजी जयंती असा उल्लेख आहे. त्यावरुनही कार्यकर्ते संतप्त झालेत. छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख असावा अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. या आंदोलनामुळे डायमंड संघटनेच्या मुजोरीला चाप बसणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ठाकरे गटानं मराठीचा मुद्दा आक्रमकपणे लावुन धरला आहे. त्याचा राजकीय फायदा होणार का? हे पाहणही महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

SCROLL FOR NEXT