ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही देखील वीकेंड ट्रिप प्लान करायचा विचार करताय, तर मुंबईजवळ असलेल्या या सुंदर आणि शांत ठिकाणांना नक्की भेट द्या.
लोणावळा हे मुंबईजवळील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. येथे फिरण्यासाठी, टायगर्स लीप, भूशी डॅम, आणि कार्ला लेणी ही प्रसिद्ध ठिकाणं आहेत.
मुंबईजवळ काही अंतरावर वसलेले खंडाळा हिल स्टेशन, शांत वातावरण आणि मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
जर तुम्हाला बीचवर वेळ घालवायचा असेल तर स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि वॉटर स्पोर्ट यासाठी अलिबाग एक परफेक्ट पिकनिक स्पॉट आहे.
मुंबईच्या गर्दी आणि उष्णतेपासून दूर शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी महाबलेश्नवरला नक्की भेट द्या. हे हिल स्टेशन निसर्गरम्य दृश्यांसह, स्ट्रॅाबेरी फार्मिंग, वेण्णा लेक आणि मॅप्रो गार्डनसाठीही प्रसिद्ध आहे.
वनडे ट्रिप किंवा वीकेंड ट्रिपसाठी माथेरान एक परफेक्ट पिकनिक स्पॉट आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग करु शकता. तसेच पॅनोरमा पॉईंटला भेट देऊ शकता.
कर्जतमध्ये तुम्ही धबधबे, किल्ले आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कर्जतमध्ये कुम्ही कोंडाणा गुफा देकील एक्सप्लोर करु शकता.