Maharashtra Politics, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Maharashtra Politics, Eknath Shinde, Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ठाकरे की शिंदे? शिवसेनेवर हक्क कुणाचा? राज्यातील सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' सुनावणी

Satish Daud-Patil

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेनेवर हक्क कुणाचा? याबाबतचे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचे की नाही, यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News)

त्याचबरोबर आज जो काही निर्णय होईल त्यावर या खटल्याच्या निकालाचं वेळापत्रकही अवलंबून असणार आहे. हे प्रकरण जर ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेलं तर निकालाला आणखी वेळ लागेल. जर सध्याच्याच घटनापीठाकडे राहिलं तर मग सलग सुनावणी तातडीनं सुरु होणार का याचीही उत्सुकता असेल. (Latest Marathi News)

याशिवाय सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत निर्णय होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. या १६ आमदारांवर कारवाई होईल आणि महाराष्ट्रातलं सरकार कोसळेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेनेतून (Shivsena) फुटून निघालेल्या आमदारांच्या अपात्रतेसाठी आणि राज्य सरकारच्या घटनात्मक वैधतेसह अन्य मुद्द्यांना आव्हान देणाऱ्या याचिका शिवसेना नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी सादर केल्या आहेत. तर आमदार अपात्रतेच्या नोटीसा, शिवसेना विधिमंडळ नेतेपदावरून दूर करण्याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय यासह काही बाबींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार भरत गोगावले आदींनी आव्हान दिले आहे.

विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस देण्यात आली असेल तर त्यावर विधानसभेत निर्णय होईपर्यंत अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय देता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने अरुणाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष नबम रेबियाप्रकरणी काही वर्षांपूर्वी दिला आहे. शिंदे गट याच निकालाचा आधार घेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अपात्रतेबाबत कारवाईचा अधिकार नाही असं म्हणतोय.

या १६ आमदारांना नोटीसा

महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुवाहाटीला गेलेल्या १६ आमदारांना तुमच्यावर कारवाई का करू नये? याबाबत 48 तासात उत्तर द्यायची नोटीस पाठवली होती. यामध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले. संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोराने आणि चिमणराव पाटील या आमदारांच्या नावाचा समावेश होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT