Uddhav Thackeray Demand Trishul Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena: उद्धव ठाकरेंकडून 'त्रिशूळ'सह तीन चिन्ह सादर; पण त्यापैकी एकही मिळणार नाही; कारण...

Uddhav Thackeray Demand Trishul: उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे १) त्रिशुळ २) उगवता सुर्य आणि ३) मशाल या तीन चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाकडून आयोगाला देण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे, मुंबई

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेतील दोन्ही गटांकडे आता धनुष्यबाण चिन्ह वापरण्याचा अधिकार तात्पुरता काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी नवं चिन्ह ठरवलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पक्षासाठी संभावित नावं आणि चिन्ह ठरवलं असून त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला ३ पर्याय पाठवले आहेत. मात्र, हे तिनही चिन्हे निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याने आता उद्धव ठाकरेंची ही मागणी पूर्ण होणार का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. (Shivsena Lates News)

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे १) त्रिशुळ २) उगवता सुर्य आणि ३) मशाल या तीन चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाकडून आयोगाला देण्यात आले आहेत. याशिवाय आपल्या गटाचं नावं हे १) शिवसेना बाळासाहेब ठाकरे २) शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि ३) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळावं अशी मागणी आयोगाकडे ठाकरे गटाने केली आहे. चिन्हांच्या बाबतीत बोलायचं झालं तर निवडणूक आयोगाकडे एकूण १९७ चिन्हे उपलब्ध आहेत. यातूनच दोन्ही गटांना आपापली चिन्हे निवडण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी आयोगाला पाठवलेली तिनही चिन्हे आयोगाच्या यादीत नसल्याने त्यांना ही चिन्हे मिळणार हा याबाबत शंका आहे.

उद्धव ठाकरेंनी ती तीन चिन्हे मागण्याही असू शकतात ही कारणं

-याबाबत उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, फ्री चिन्हांच्या यादीत त्रिशूळ समाविष्ट नसले तरी त्रिशूळ चिन्ह वापरण्याबाबत कायदेशीर अडचण नाही.

निवडणूक आयोगानंही त्रिशूळ वापरता येत नसल्याचे कोणतेही गाईडलाईन्स दिले नाहीत.

वाहन तसेच इतर चिन्ह शिवसेनेला लागू होत नाहीत.

त्रिशूळ चिन्ह देशात कोणत्याही राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाकडे नाही.

शिवसेनेची विचारधारा, आचार विचार आणि तत्वाला साधर्म्य असे चिन्ह त्रिशूळ आहे.

महत्वाचं म्हणजे ही तीनही चिन्ह हिंदू धर्माशी निगडीत आहेत.

दरम्यान केंद्रीय निवडणुक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकासाठी दोन्ही गटांना उद्या, म्हणजे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत आपापलं चिन्ह निवडण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पहावं लागेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: धाड धाड गोळ्या झाडल्या, आणखी एका कबड्डीपटूची हत्या, आठवडाभरातील दुसरी घटना

Korlai Fort History: रायगडातील 'या' किल्ल्यावर आहे 'चर्च'; इतिहास माहितीये का?

Maharashtra Live News Update: नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याची कुंभमेळामंत्री गिरीश महाजन करणार पाहणी

Accident News : मुंबईहून पुण्याला जाताना तरुणाचा भीषण अपघात; घाटात तोल गेला, १०० फूट दरीत कोसळून मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० रुपये खटाखट येणार? ३ महिन्याचा हप्ता एकत्र देणार; कारण काय?

SCROLL FOR NEXT