सचिन गाड
Uddhav Thackeray News: शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडत आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'भाजप संपूर्ण उभा राहिला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवू शकत नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिलं. (Latest Marathi News)
शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्या राज्य आणि जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
या उपस्थित पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमच्या ६-७ पिढ्या आज जनसेवा करत आहेत. संपूर्ण भाजप उभा राहिला, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवू शकत नाही'.
'हिंदुत्व हिंदुत्व आहे, ते बदलू शकत नाही. पण काळानुसार भूमिका घ्याव्या लागतात, तशा प्रबोधनकार आणि बाळासाहेबांनी भूमिका घेतल्या. आता मी घेतोय. आमचं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. जगातील सर्वात शक्तीमान नेता विश्वगुरू सत्तेत असताना राज्यात हिंदू आक्रोश मोर्चा काढावा लागतो आहे. मी काँग्रेसबरोबर का गेलो, कोणामुळे गेलो? गेलो तरी हिंदुत्व सोडलं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. 'आम्ही विरोधी पक्ष आहोत, मात्र जे भारत मातेच्या विरोधात आहेत, त्याचे विरोधक आहोत. 'इंडिया'वर पंतप्रधान मोदींनी टिपण्णी केली, त्यांनी इंडियन मुजाहिद्दीन यांच्याशी तुलना केली. जेव्हा तुम्ही अमेरिकेत बायडन यांना मीठी मारतात, तेव्हा इंडियाचे पंतप्रधान म्हणून मिठी मारतात की इंडियन मुजाहिद्दीनचे पंतप्रधान म्हणून मारतात, असं म्हणत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.