Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

मतं मागायची असतील तर तुमच्या बापाच्या नावाने मागा; उद्धव ठाकरे बंडखोरांवर संतापले

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहे. अशातच एकनाथ शिंदे यांचा गट आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे गट असं नाव देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव वापरणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. “हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. (Uddhav Thackeray Latest News)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आज शिवसेना भवनात पार पडली या बैठकीत ते बोलत होते. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरेंकडेच असणार हे आता स्पष्ट झालं आहे. यावेळी “मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा आजतादायत केली नाही. इथून पुढेही करणार नाही. हिंमत असेल तर स्वताच्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४० हून अधिक आमदारांसह बंड केल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केल्यानंतर शिंदे यांनी बंड सुरूच ठेवलं आहे. अशातच शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने आज तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक दुपारी शिवसेना भवन येथे बोलावली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांचे राष्ट्रीय कार्यकारणी समितीतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याने महाराष्ट्रातील शिवसैनिक आणखीच आक्रमक झाले आहे. जाणिवपूर्वक आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देवून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील जनतेला भावनिक करत आहे. असं शिवसैनिकांनी म्हटलं आहे. शिवसेनेतून बंड करून कुणी शिवसैनिक होतो का? असा प्रश्नही शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT