मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेनं शिंदे (Eknath Shinde) गटाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरायला विरोध केला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन करून सुद्धा शिंदे गटाने आपलं बंड सुरूच ठेवलं. त्यामुळे आता शिंदे गटाविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. (Eknath Shinde Latest News)
शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नामकरणाच्या तयारीत आहे. अशातच शिंदे हे आपल्या गटाला 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' असं नाव देणार असल्याचं समोर आलं होतं. शिंदे यांच्याकडून तशी अधिकृत घोषणा झाली नसली तरी, इतर बंडखोर आमदारांनी गटाचं नामकरण 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' असंच होणार अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती.
मात्र, शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं वापरण्याचा कुणाला अधिकार नाही. असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. याबाबत शिवसेना निवडणूक आयोगाला तसं पत्र देणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश शिवसेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणीतून हकालपट्टी करण्याचा ठराव मांडला असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, लीलाधर डाके, रामदास कदम, संजय राऊत, सुधीर जोशी, अनंत गीते, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ यांचा समावेश होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.