Eknath Shinde News, Uddhav Thackeray News Saam TV
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार?; शिवसेना महिला नेत्याचं खळबळजनक ट्विट

दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत (ShivSena) उभी फूट पडली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. अशातच शिवसेनेच्या महिला नेत्या दीपाली सय्यद यांनी एक सूचक ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. (Ekanath Shinde Latest News)

येत्या दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच चर्चा करायला एकत्र येणार हे समजले असे दीपाली सय्यद यांनी म्हटेल आहे. दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का?, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

काय म्हणाल्या दीपाली सय्यद?

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विट करत ही माहिती दिली आहे. 'येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थीकरिता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल'. असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे. (Uddhav Thackeray Latest News)

विशेष बाब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी एकत्र यावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मदत केल्याचे सांगत दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी भाजप नेत्यांचे आभारही मानले आहेत.

'आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे'

दीपाली सय्यद यांनी आणखी एक सूचक ट्विट केलं आहे. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये दीपाली सय्यद म्हणतात, 'लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT