Uddhav Thackeray on Amit Shah Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray on Amit Shah: अमित शाहांचं आव्हान उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं, रोखठोक उत्तर देत म्हणाले...

Uddhav Thackeray on Uniform Civil Code: अमित शाहांचं आव्हान उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं, रोखठोक उत्तर देत म्हणाले...

Satish Kengar

Uddhav Thackeray on Amit Shah: 'समान नागरी कायद्यांबद्दल उद्धव ठाकरे यांचं काय मत आहे? तुम्ही समान नागरिक कायदा आणा, आमचा पाठिंबा आहे', केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रश्नाला उत्तर देत आज उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत.

नांदेडमध्ये भाजपच्या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांची समान नागरी कायद्यांबद्दल काय भूमिका आहे, हे स्पष्ट करावं असं म्हटलं होतं. याचबद्दल आज . मुंबईतील सरदार वल्लभाई पटेल संकुल (NSCI) वरळी येथे आयोजित राज्यव्यापी पदाधिकारी शिबिर 2023 येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अमित शाह यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''समान नागरिक कायदा आणण्याच्या आधी, समान नाही, लोकसत्तेत आलेला अग्रलेख वाचा. कारण सामना अनेक लोक चोरून वाचतात आणि वरून सांगतात आम्ही वाचत नाही. समान नागरी कायदा म्हणजे काय आहे? हिंदूंना त्याचा किती त्रास होणार आहे, हे आधी लोकांना सांगा. यानंतर तुम्ही पाठिंबा मागा.'' (Latest Marathi News)

काय म्हणाले होते अमित शाह?

नांदेड येथील सभेत अमित शाह म्हणाले होते की, ''उद्धव ठाकरेंनी ट्रिपल तलाख, कलम ३७०, राम मंदिर, समान नागरी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असं त्यांनी आव्हान केलं होतं. हेच आव्हान स्वीकारून उद्धव ठाकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''कुणीही देशापेक्षा मोठा होऊ शकत नाही देश सर्वोच्च. मोदींचा देश मग इतरांचा देश नाही आहे का? आमची ओळख भारतमातेचा पुत्र म्हणून व्हायला हवी. हिंदुस्थान ही ओळख मोठी पंतप्रधान उद्याही होतील अगोदर ही होते.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT