जुने 'व्हायरस' परत आलेत त्यांचा बंदोबस्त करायचा आहे - मुख्यमंत्री Saam Tv
मुंबई/पुणे

जुने 'व्हायरस' परत आलेत त्यांचा बंदोबस्त करायचा आहे - मुख्यमंत्री

आज एका वृत्तपत्र माध्यम समुहाने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: दोन दिवसांपासून महाराष्ट्रात शिवसेना भाजप (Shivsena-BJP) वाद पाहायला मिळाला. केंद्रिय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) एक वक्तव्य केले आणि संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठला. शिवसेना भाजप कार्यकर्ते एकामेकांसोबत भिडलेले पाहायला मिळाले. त्यानंतर झालेल्या संपुर्ण घटनेवर राज्यातीलच नव्हे तर देशातील नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. यासर्व प्रकरणात ज्यांच्यावरुन हे सर्व रणकंदन पेटलं होतं ते राज्याचे मुख्यमंत्री यावर कधी बोलणार असा प्रश्न विचारला जात होता. आज एका वृत्तपत्र माध्यम समुहाने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री बोलताना म्हणाले ''कोरोना अजून गेलेला नाहीय. अजून थोड्या प्रमाणात आहे. काही काही तर जूने व्हायरस परत आले आहेत. ते पण दिसत आहे. जूने व्हायरस कारण नसताना कोरोनाच्या व्हायरसमध्ये साईड इफेक्ट आणत आहेत. तर त्याही व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे आणि सोबतच कोरोनाचाही बंदोबस्त करायचा आहे.अशा परिस्थीत त्यांनी नाव न घेता नारायण राणेंवर टीका केल्याचं दिसत आहे''.

महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी राणेंच्या वक्तव्याचं नाही पण राणेंचं समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राणेंना अटक करण्याची मागणी केली होती. तिथे त्यांनी झालेल्या प्रकरणाचं नाव न घेता तसेच नारायण राणेंच नाव न घेता शाब्दिक कोपरखिळी मारली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुंबादेवी मतदारसंघात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची छुपी युती?

CJI DY Chandrachud : कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा; निरोप समारभांच्या भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?

IND vs SA 1st T20I: यजमान दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळालं स्थान?

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून आली पहिली प्रतिक्रिया

IND vs AUS: BGT आधी टीम इंडियाचा तळ्यात मळ्यात कारभार! 2 प्रश्नांनी वाढवलंय टेन्शन

SCROLL FOR NEXT