तरुणाला गाडी सकट टेम्पोत टाकण्याचं प्रकरण भोवलं; पोलिस अधिकाऱ्याची बदली

पुण्यातील नाना पेठ परिसरात काही दिवसांपुर्वी माणसा सकट गाडी उचलून टेम्पोत भरण्याचा प्रकार घडला होता.
तरुणाला गाडी सकट टेम्पोत टाकण्याचं प्रकरण भोवलं; पोलिस अधिकाऱ्याची बदली
तरुणाला गाडी सकट टेम्पोत टाकण्याचं प्रकरण भोवलं; पोलिस अधिकाऱ्याची बदली Saam TV
Published On

पुणे: पुण्यातील नाना पेठ परिसरात काही दिवसांपुर्वी माणसा सकट गाडी उचलून टेम्पोत भरण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पुण्यातील पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता ते प्रकरण संबंधीत पोलीस अधिकाऱ्याला चांगलच भोवलं आहे. वादग्रस्त पोलीस निरीक्षक म्हणून ओळख असलेले राजेश पुराणिक यांची बदली विशेष शाखेत झाली आहे. दुचाकीसह टोइंग व्हॅनमध्ये भरण्याचे प्रकरण पोलिसाला भोवले आहे. प्रशासन विभागातील अप्पर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी बदलीबाबतचे आदेश काढले आहेत

तरुणाला गाडी सकट टेम्पोत टाकण्याचं प्रकरण भोवलं; पोलिस अधिकाऱ्याची बदली
पंढरपुरातील २१ गावांत आजपासून कडक लॉकडाउन

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी (Trafic Police) नाना पेठ परिसरात (Nana Peth) एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टेम्पोत भरले होते. यावरून भारतात लोकशाही आहे की, तालीबानी कारभार, असा प्रश्न पुणेकरांना पडला होता. चौका-चौकात ग्रुपने ठिय्ये मारून ये-जा करणार्‍या चाकरमान्या दुचाकी स्वारांना अडवून काही न काही कारणे सांगून अडविणे, त्यांच्याकडून वसुली केली जाते.

हे प्रकार शहरात सर्रासपणे घडत असतानाच, मागच्या काही दिसवांपुर्वी समर्थ वाहतूक पोलिस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात हा प्रकार घडला होता. यावेळी वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्याची चूक वाहतूक पोलिसाने करणे, तरी कितपत योग्य आहे असा प्रश्न पुणेकरांना पडला होता.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com