Uddhav-Raj Thackeray Alliance 
मुंबई/पुणे

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Uddhav- Raj Alliance: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरलाय. कधी ही घोषणा होणार आहे? जागा वाटपाचा अखेर काय फॉर्म्युला ठरला? भाजप आणि शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंनी काय रणनीती आखलीय? पाहूया यावरचा विशेष रिपोर्ट.

Suprim Maskar

  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती अंतिम टप्प्यात

  • भाजप आणि शिंदेसेनेला आव्हान देण्यासाठी संयुक्त रणनीती

  • जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती

हो.. नाही, हो.. नाही. म्हणता म्हणता ठाकरे बंधुचं अखेर जुळलंच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची इच्छा त्याच्या निधनानंतर 13 वर्षांनंतर तर तमाम मराठी जनांची इच्छा अखेर पुर्ण होतेय. शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ संजय राऊतांनी प्रितीसंगमांच्या घोषणेनंतर अखेर बुधवारी 24 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजताचा युतीचा मुहूर्त अगदी दोन शब्दात

जाहीर करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एक फोटो ट्विट केलाय. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जागावाटप पुर्ण होऊन कुठे कुठे युती होणार हे देखिल संजय राऊतांनी सांगून टाकलं. सेना मनसेनं अनेक चर्चा बैठका गाठी भेटी घेऊन भविष्यात युतीत कुठलाच खडा पडणार नाही याची दक्षता घेऊन युतीसंदर्भात मोठा निर्णय घेतला. कारण या आधी 2017 मध्ये शिवसेनेनं राज्यात भाजप सोबत सत्तेत असूनही महापालिकेत युती तोडून निवडणूका लढवल्या होत्या. त्यावेळी सेना मनसेची युती होईल अशी चर्चा असतांना ती फिस्कटली.मात्र यावेळी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवूनच ठाकरें बंधूनी युतीचं पाऊल टाकलंय.

युती आधी सेना मनसेचं जागावाटप झाल्याची चर्चा असून ठाकरेसेना 145 ते 150, मनसे 70 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 15 जागांवर लढण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या युतीची बातमी आली आणि त्याची चर्चा नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे युती जाहीर करण्याची घोषणा झाल्या झाल्या मित्रपक्ष आणि विरोधकांच्या प्रतिक्रीया समोर आल्या.

अनेक वर्षांनंतर, 22 डिसेंबर 2024 ला म्हणजे बरोबर एक वर्षांपुर्वी संपुर्ण ठाकरे कुटुंब राज ठाकरेंची बहीण जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं एकत्र आलं होतं. त्यानंतर ५ जुलैला हिंदीसक्तीच्या विरोधात ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. त्यानंतरच्या सहा महिन्यात ठाकरे बंधु, कधी मोर्चात, कधी कौटुंबिक कार्यक्रमात, कधी सामाजिक कार्यक्रमात, कधी सणात तर कधी स्नेह भोजनासाठी एकत्र आले.

याच वाढलेल्या भेटीगाठीमध्ये युतीच्या चर्चांना उधाण आलं त्यात ठाकरे ब्रँडवर आलेलं अस्तित्वाचं संकट दूर करण्यासाठी ठाकरेंना एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचं दिसल्यानं आता 20 वर्षांनंतर ठाकरे एकत्र येत निवडणुकांना सामोरे जातायेत. त्यामुळे ही युती जनता स्विकारते की नाकारते याचा फैसला येत्या 16 जानेवारीलाच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Crisis: धुळ्यात SRPF जवानाला बेदम मराहाण, गॅस एजन्सीबाहेर नागरिकांचा तुफान राडा; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक पेट घेतला

Summer Season Saree Designs: उन्हाळ्यात कोणती साडी नेसावी? हे 5 पॅटर्न ट्रेडिंगमध्ये

Saree Reuse Dress: लग्नसराई ते डेली वेअर, कपाटातल्या जुन्या साड्यांपासून शिवता येतील ७ नवे ट्रेंडी ड्रेस

LPG Gas Cylinder: कॉल करुन सिलेंडर बुक होत नाही? आत्ताच फॉलो करा या ४ स्टेप्स; बुकिंग करूनही न मिळाल्यास 'इथे' करा तक्रार

SCROLL FOR NEXT