Uddhav Thackeray News  Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार? उद्धव ठाकरे यांनी बैठकीत शाखाप्रमुखांना काय सूचना दिल्या?

Uddhav Thackeray News : दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर आज झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांना निवडणुकीला कामाला लागण्याचे आदेश दिले.

Vishal Gangurde

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता

युतीची घोषणा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीये

शिवसेना भवनमध्ये झालेल्या शाखाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीचे आदेश दिलेत

संजय गडदे, साम टीव्ही

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनेक गाठीभेटी झाल्या. काही ठिकाणी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र आंदोलन करतानाही दिसले. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होतेय. याच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात होण्याची मोठी शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईतील शाखाप्रमुखांची शिवसेना भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शाखाप्रमुखांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीला मुंबईतील शाखा प्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख उपस्थित होते. आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने शिवसेना भवन येथील बैठकीला महत्व प्राप्त झालं होतं.

तीन दिवसांपूर्वी मुंबई आमदार आणि खासदारांची आणि जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक मातोश्रीवर पार पडली होती. त्यानंतर आता शाखाप्रमुखांसोबत उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुख, इतर पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महापालिकेच्या २२७ वॉर्डमध्ये निवडणूक लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. 'कुणाशी युती करायची किंवा होईल, याबाबत नंतर निर्णय घेऊ. तुम्ही आपापसातील हेवेदावे विसरून कामाला लागा,असेही ठाकरेंनी सांगितलं आहे.

'गटप्रमुख उपशाखाप्रमुख विश्वासात घेऊन मतदारांपर्यंत पोहोचा. युतीसंदर्भात दसरा मेळाव्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. गटप्रमुख जीव की प्राण. भाजपने पक्ष चिन्ह चोरलं. जे गेले आणि परत आले, तर त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: बिल्डर अग्रवाल यांच्या मुलाच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सिया आणि चेतननं 14 जूनलाच आखला होता कट

कोट्यवधींची ऑफर फेटाळली, मंत्रिपदही नाकारलं; ठाकरेंच्या निष्ठावंत खासदाराचा होणार भव्य नागरी सत्कार

Foot Care In Monsoon : पावसाचे घाणेरडे पाणी पायांसाठी धोकादायक, उद्भवेल 'ही' गंभीर समस्या

Maharashtra News Live Update:परळीच्या चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता

Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची ट्रकला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT