raj and uddhav thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे सुसाट, पण राज ठाकरेंचं मौन का? वाचा स्पेशल रिपोर्ट,VIDEO

Uddhav thackeray and Raj : मराठीच्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आले....त्यानंतर उद्धव ठाकरेंनी वारंवार एकीचा उल्लेख केलाय.. तर दुसरीकडे राज ठाकरे मात्र मौनात गेलेत.. त्याची कारणं काय आहेत? पाहूयात....

Bharat Mohalkar

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मराठीच्या विजयी मेळाव्यात एकीची वज्रमूठ आवळली.... त्यानंतर उद्धव ठाकरे सुसाट निघालेत... मराठी माणसांसाठी वैयक्तिक मतभेद विसरुन राज ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र आलो, याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केलाय.

तर दुसरीकडे मराठीसाठी मिरा रोडला ठाकरे सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मोर्चा काढला... त्यामुळे पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन सुरु असतानाच राज ठाकरेंनी मात्र तोंडावर बोट ठेवलंय...

मनसेचा पदाधिकाऱ्यांना 'राज' आदेश

पक्षातील कोणीही माध्यमांशी संवाद साधू नये

स्वतःचे प्रतिक्रीयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू नयेत

अधिकृत जबाबदारी दिलेल्या प्रवक्त्यांनी परवानगी घेऊन भूमिका मांडावी

परवानगीशिवाय माध्यमांशी संवाद साधू नये

सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये

ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती असल्याची चर्चा रंगलीय. मात्र या मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी युतीच्या चर्चांवर मौन पाळलंय...मात्र यामागे मुंबई महापालिकेचं गणित असल्याची चर्चा आहे... ते नेमकं काय आहे? पाहूयात...

मनसेवर अँटी हिंदू हा शिक्का बसू नये यासाठी प्रयत्न सुरु

राज ठाकरेंकडून जनतेच्या मतांची चाचपणी

पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम ठेवून योग्य वेळी निर्णय घेण्याची शक्यता

राज ठाकरेंनी मेळाव्यातही स्पष्ट भूमिका नाही

युतीमुळे कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, याची ठाकरेंकडून दक्षता

युतीमुळे कार्यकर्ते फुटू नये याची ठाकरेंना भीती

2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला 8 टक्के तर शिवसेनेला 30.41 टक्के मिळाले होते.. तर 28.28 टक्के मुंबईकरांनी भाजपला मतदान केलं होतं.. मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय... शिवसेनेत फूट पडलीय... त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सुसाट निघाले असले तरी राज ठाकरे मात्र निवडणूकीच्या तोंडावर आपला पत्ते उघड करणार का? याचीच उत्सुकता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT