Thackeray alliance suffers defeat in BEST Bank election, BJP-Shashankrao panel emerges victorious in Mumbai. Saam TV News
मुंबई/पुणे

ठाकरे ब्रँडला मुंबईत मोठा धक्का, भाजप अन् शशांकराव पॅनलचा 'बेस्ट' विजय

Raj Thackeray and Uddhav Thackeray alliance suffers setback before BMC elections : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाला. तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. हा पराभव बीएमसी निवडणुकीआधीचा मोठा धक्का मानला जातो. शशांक राव यांच्या पॅनलने तब्बल १४ जागांवर विजय मिळवला तर प्रसाद लाड यांच्या पॅनलला ७ जागा मिळाल्या.

Ganesh Kavade, Namdeo Kumbhar

  • बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीला एकही जागा जिंकता आली नाही.

  • शशांक राव पॅनलने तब्बल १४ जागांवर विजय मिळवला.

  • प्रसाद लाड पॅनलने ७ जागांवर बाजी मारली.

  • बीएमसी निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा राजकीय धक्का बसला.

BJP and Shashankrao panel wins against Thackeray alliance in BEST polls : मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडला जोरदार धक्का बसला आहे. बेस्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाकरेंच्या युतीला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक एकत्र लढवली होती, पण यामध्ये त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. बेस्ट बँक निवडणुकीत ठाकरेंना खातेही उघडता आले नाही. शशांक राव यांच्या पॅनलने १४ जागेवर विजय मिळवला तर प्रसाद लाड यांच्या पॅनलने ७ जागेवर बाजी मारली आहे. (BEST Bank election results Mumbai impact on upcoming civic polls)

तब्बल २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. बीएमसी निवडणुकीआधी झालेल्या या लिटमस चाचणीत त्यांना अपयशाचा जोरदार धक्का बसला आहे. बेस्ट बँकेच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला जोरात धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच हा मोठा धक्का मानला जातोय. बेस्ट निवडणुकीत मिळालेला मोठा धक्का आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही? असा प्रश्न त्यामुळे पुन्हा उपस्थित केला जातोय. ठाकरे ब्रँड एकत्र आल्याने काही होत नाही, आशा प्रतिक्रिया भाजप अन् शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात येत आहे.

बेस्ट पतपेढी निवडणुकीत पहिल्या फेरीमध्ये ठाकरेंच्या युतीने जोरदार आघाडी मिळावली होती. मुंबई महापालिका निवडणुकीची 'सेमी-फायनल' ठाकरे जिंकणार असे वाटत असतानाच दुसऱ्या टप्प्यात बाजी फिरली. 26 डेपोंपैकी 18 डेपोंच्या मतमोजणीमध्ये ठाकरे-मनसे पॅनल पुढे होते. पहिल्या टप्प्यात ​ठाकरे-मनसे पॅनल 928 मते मिळाली होती. तर महायुती (भाजप) पॅनल: 316 मते, आणि ​शशांक राव पॅनलला 683 मते मिळाली होती. पण दुसऱ्या टप्प्यात बाजी बदलली. अखेरच्या चार फेऱ्यांमध्ये ठाकरेंचा पराभ झाला. हा निकाल मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. यामध्ये ठाकरेंना पराभवाचा जोरदार धक्का बसला आहे.

शशांक राव पॅनलचे विजयी उमेदवार - एकूण १४

1. आंबेकर मिलिंद शामराव

2. आंब्रे संजय तुकाराम

3. जाधव प्रकाश प्रताप

4. जाधव शिवाजी विठ्ठलराव

5. अम्मुंडकर शशिकांत शांताराम

6. खरमाटे शिवाजी विश्वनाथ

7. भिसे उज्वल मधुकर

8.. धेंडे मधुसूदन विठ्ठल

9. कोरे नितीन गजानन

10. किरात संदीप अशोक

महिला राखीव

11. डोंगरे भाग्यश्री रतन

अनुसूचित जाती/ जमाती

12. धोंगडे प्रभाकर खंडू

भटक्या विमुक्त जाती

13 चांगण किरण रावसाहेब

इतर मागासवर्गीय

14 शिंदे दत्तात्रय बाबुराव

प्रसाद लाड यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार - एकूण ७

1 रामचंद्र बागवे

2 संतोष बेंद्रे

3 संतोष चतुर

4 राजेंद्र गोरे

5 विजयकुमार कानडे

6 रोहित केणी

महिला राखीव मतदार संघ

7 रोहिणी बाईत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Maharashtra Rain Live News : - सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

SCROLL FOR NEXT