Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Anniversary: वर्धापन दिनावरून शिवसेनेच्या दोन गटात 'सामना'! ठाकरे-शिंदे पुन्हा शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत

Vishal Gangurde

Mumbai News: राज्यातील सत्तासंघर्षानंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट तयार झाले आहेत. दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. दसरा मेळाव्यानंतर आता मुंबईत दोन शिवसेना वर्धापन दिन सोहळे पाहायला मिळणार आहे. यासाठी दोन्ही गट कामाला लागले आहेत. (Latest Marathi News)

१९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. शिवसेना फुटीनंतर आता मुंबईत दोन वर्धापन सोहळे पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी आज मुंबईत दोन्ही गटाच्या स्वतंत्र्य बैठकी झाल्या.

ठाकरे गटाकडून पक्षाच्या वर्धापन दिनाची जबाबदारी ही मुंबईतील विभागप्रमुखांकडून सोपवण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात ठाकरे गटाचे प्रमुख नेते वरळी येथील NSCI डोम कार्यक्रम ठिकाणी भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वर्धापन दिन हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.

तर दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्यांची देखील आज बैठक पार पडली. शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिवस हा मुंबईतील नेस्को सेंटर येथे पार पडणार आहे. शिवसेनेचे सर्व आमदार,मंत्री त्याचबरोबर प्रतिनिधींकडून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

दसरा मेळाव्यानंतर दोन वर्धापन दिन

गेल्या वर्षी दोन्ही गटांचा मुंबईत दसरा मेळावा पार पडला होता. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर पार पडला. तर शिंदे यांचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर पार पडला होता. दसरा मेळाव्यानुसार यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन देखील दोन ठिकाणी पार पडणार आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी वर्धापन दिनासाठी तयारी सुरू केली आहे.

विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता सर्वांचेच लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लागले आहे. 16 आमदारांना अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत घाईघाईने निर्णय घेणार नाही, असेही नार्वेकरांनी याआधी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patna News: शाळेजवळच्या नाल्यात सापडला ७ वर्षीय मुलाचा मृतदेह; आक्रमक पालकांनी लावली शाळेला आग

Today's Marathi News Live : पुणे छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा

Rasta Roko Andolan: पाण्यासाठी शेतकऱ्यांनी राेखला नगर मनमाड महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा

Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

SCROLL FOR NEXT