Uday Samant on Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Uday Samant News : महायुतीचे 200 पेक्षा जास्त आमदार, ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून येणार, उदय सामंताना विश्वास

प्रविण वाकचौरे, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : आमच्यावर, आमच्या नेतृत्वावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम विरोधकांनी सुरु ठेवला आहे. स्वतःकडे असलेले निवडक आमदार व निवडक कार्यकर्ते टिकवण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरु आहे. त्यांची ही अस्तित्वाची लढाई सुरु आहे, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

कुणी कितीही दौरे केले व कितीही आदळाआपट केली तरी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महायुतीचे आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त खासदार व विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

आम्ही जनतेशी व जनतेच्या विकासाशी बांधील आहोत, तेच आमचे उद्दिष्ट आहे, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले. राज्यातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली होतील, याचा पुनरुच्चार सामंत यांनी केला. (Political News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार दमदारपणे वेगाने काम करत आहे. त्यामुळे आम्ही विरोधकांच्या कोणत्याही आरोपांना महत्त्व न देता जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत. आम्हाला शिवीगाळ करुन कुणाला त्यांची सत्ता येईल, असे वाटत असेल तर ती त्यांची दिवास्वप्ने आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. (Latest Marathi News)

सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने त्यांचा तिळपापड होत आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम काही लोकांना झोंबला आहे. कोट्यवधी जणांना या कार्यक्रमाचा लाभ होत आहे. ही संकल्पना पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवली आहे.

त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिंदेंचे कौतुक झाल्याने काहीजणांच्या पोटात दुखत आहे. सर्वसामान्य घरातील मुख्यमंत्री होऊ नये असा विचार असणारेच टीका करत आहेत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT