- अक्षय बडवे
पुण्यातील डेक्कन (deccan pune) परिसरातील आर डेक्कन येथील इमारतीसमाेर आज (बुधवार) सांयकाळच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते निलेश राणेंच्या (bjp leader nilesh rane) विरोधात "बँड बाजा" आंदोलन छेडले आहे. या आंदाेलनाची खूमासदार चर्चा परिसरात सुरु आहे. (Maharashtra News)
पुणे महापालिका प्रशासन थकीत मिळकतकर वसूल करण्यासाठी बड्यांसह छाेट्या थकबाकीदारांवर कारवाई करीत आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी सव्वा महिना शिल्लक असताना प्रशासनापुढं सुमारे 400 कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान आहे.
आज महापालिकेने आर डेक्कन परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मिळकत सील केली. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनूसार निलेश राणेंची तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान निलेश राणेंकडून थकीत रक्कम लवकर वसूल व्हावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मैदानात उतरलेत. त्यांनी आज आर डेक्कन परिसरातील राणेंच्या इमारतीसमाेर जात बँड वाजविला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.