Police Station  गोपाळ मोटघरे
मुंबई/पुणे

पुनावळे येथे ऑटोचालकांची उबेर बाईक चालकाला बेदम मारहाण, दोघांना अटक

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

गोपाळ मोटघरे

पुणे - हिंजवडी परिसरातील पुनवळे येथे ऑटोरिक्षा (Auto Rickshaw) चालकांनी उबेर बाईक चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उबर बाईक चालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोन रिक्षाचालकांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या मारहाण प्रकरणी अंकुश कृष्णा सूर्यवंशी या उबेर बाईक चालकाने हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये बाबुराव पांचाळ, शरण बसप्पा पांचाळ आणि हनुमंत माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीन ऑटो-रिक्षा चालकांनी शुक्रवारी दुपारी तक्रारदार सूर्यवंशी याला बुकिंग करून बोलावले. त्यानंतर सूर्यवंशी पुनावळे येथील घटनास्थळी पोहोचल्यावर रिक्षाचालकांनी आमचं भाडं तू का पळवतो त्यामुळेआमचे नुकसान होत आहे असा ठपका लावला. तसेच त्याला स्वतःचा मोबाईल दगडाने फोडून काढण्यास भाग पडले. या प्रकरणी पोलिसांनी बाबुराव पांचाळ आणि हनुमंत माने या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT