drowned , panvel , youth, ganpati , ganeshotsav 2022 SaamTv
मुंबई/पुणे

Panvel News : गणेश विसर्जनाप्रसंगी कोप्रोलीतील युवक बुडाले

पोलीस आणि अग्निशमन दलातील जवानांमार्फत बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध घेण्यात येत आहे असे पाेलिसांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Panvel News : पनवेल (panvel) मधील कोप्रोली गावातील कमांडर सोसायटी मधील दोन युवक रात्री उशिरा गणेश विसर्जन करताना बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोप्रोली गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलीस (police) आणि अग्निशमन दलातील जवानांमार्फत बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध घेण्यात येत आहे असे पाेलिसांनी नमूद केले.

राजशेखर माणिक जमादार (वय 20) आणि विक्रम दिगंबर जमादार (वय 21) अशी विसर्जना दरम्यान बुडालेल्यांची नावं आहेत. स्वतःच्या घरचे विसर्जन आटोपून दोघे कमांडर सोसायटीच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कोप्रोली गावातील विसर्जन घाटावर गेले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

दोन्ही युवक एकाच कुटुंबातील असून स्वतःची मुले डोळ्या समोर बुडताना पाहण्याचे दुर्दैव या कुटुंबियांना आले. हे युवक बुडाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अद्यापही दोन्ही युवकांचा शाेध लागलेला नाही. पोलीस आणि अग्निशमन दलातील जवानांमार्फत बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध घेण्यात येत आहे असे पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Seat Sharing : शिवसेना-भाजपचं जागावाटप ठरलं, कल्याणमध्ये कोण किती जागा लढणार? वाचा

Maharashtra Live News Update: पुण्यात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीशी युती नाही

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT