Dombivli Railway Station Saam Tv
मुंबई/पुणे

डोंबिवलीत धक्कादायक प्रकार; दोन दिवसात दोन तरुणांची आत्महत्या

डोंबिवलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली - डोंबिवलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे डोंबिवली (Dombivli) हदरली असून सांस्कृतिक शहरात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

डोंबिवली मधील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वय 18 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या आयरेगावातील समतानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या या तरुणाने गुरुवारी दुपारी साडेबारा बाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्टेशनसमोर (Railway Station) धावत्या लोकल समोर येऊन आपली जीवनयात्रा संपवली.

हे देखील पाहा -

मोटरमनने रेल्वे स्टेशन प्रबंधकांना सदर घटनेची माहिती दिली. स्टेशन प्रबंधकांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती वपोनी मुकेश ढगे यांनी दिली. मात्र या तरुणाने आत्महत्या का केली हे आद्यप समजलेले नाही.

या घटनेपूर्वी बुधवारी कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान एका तरुणांचा मृत्यू झाला. डोंबिवली पूर्वकडील म्हात्रे नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने कोपर ते दिवा स्थानका दरम्यान लोकल समोर जाऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणीचे देखील वय १८ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणीचे त्याच्या वडिलांसोबत भाडणं झाले होते. या रागातून त्याने आत्महत्या केल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT