House Wall Collapsed in Antop Hill  Saam TV
मुंबई/पुणे

Antop Hill Accident: अँटॉप हिलमध्ये मोठी दुर्घटना, घराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Wall Collapsed in Antop Hill: अँटॉप हिलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येते घराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

Satish Kengar

मुंबईतील अँटॉप हिलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील विजय नगरमधील पंजा गल्लीत घराचा काही भाग कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज रात्री 9.27 च्या सुमारास घडली आहे.

येथील झोपडपट्टीत असलेल्या घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भिंतीचा काही भाग कोसळून ही घटना घडली आहे.

भिंतीचा भाग कोसळल्यानंतर या दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच दोन्ही महिलांचा मृत्यू झाला होता. शोभादेवी मौर्य ( वय ४५) आणि झाकिरूनिसा शेख ( वय ५०), असं मृत महिलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात झाल्यानंतर नागरिकांनी याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले.

मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य वेगाने केले जात आहे. स्थानिक अग्निशमन दल, वॉर्ड स्तरावरील कर्मचारी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वंदे भारत ट्रेनला अपघात; मुंबईहून सुटलेल्या ट्रेनचा डबा पुणे रेल्वे स्थानकाजवळ घसरला

जेवणानंतर कलिंगड खाणं जीवावर बेतलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Makeup Tips: ग्लॉस की मॅट; स्किन टाईपनुसार कोणती लिपस्टिक कधी लावली पाहिजे?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पाऊस, कांद्याचं झालं नुकसान

Kiwi Icecream: मुलं फळं खायला नाक मुरडतात? १ ट्रिकने बनवा आंबट-गोड किवी आईस्क्रीम, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT