raksha bandhan, pune, sister, rajgurunagar saam tv
मुंबई/पुणे

Raksha Bandhan : बहिणीनं बांधली बहिणीस राखी; राजगुरुनगरात दाेन बहिणींचं अनोखं रक्षाबंधन

आज देशभरात माेठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरी केली जात आहे.

रोहिदास गाडगे

Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हटलं बहिण भावाच्या बंधनांचा सण. बहिणीच्या रक्षणाची शपथ देऊन बहिण राखीचा धागा भावाच्या हातुन बांधते आणि सदैव माझ्या पाठीशी उभं रहाण्याचे वचन भावाकडुन घेते. मात्र बहिणींला भाऊच नसल्याने निराश न होता बहिणच भावाची भुमिका बजावतेय. हाेय ! राजगुरुनगर येथील दोन चिमुकल्यांनी आपल्याला भाऊ नाही याची खंत न बाळगता आज उत्साहात राखी पाेर्णिमा साजरी केली.

राजगुरुनगर येथील या दोन चिमुकल्यांना भाऊ नाही मात्र भाऊ नसल्याची खंत न ठेवता झाशी राणी, राजमाता जिजाऊ, आहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन एकमेकींना राखी बांधून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी आणि वाईट प्रवृत्ती पासून रक्षा करण्याच जणू वचनच दिलंय.

आम्हीही कुठं कमी नाही असं म्हणत आपल्या चिमुकल्या बहिणीच्या रक्षण करण्याची जबाबदारी घेत रक्षेच्या बंधनाचा धागा बांधला. समाजात आजही अनेक ठिकाणी नकोशी पहायला मिळतात. जन्मदातेच लेकीला नकोशी म्हणुन जन्मताच तिला रस्त्यावर सोडुन निघुन जातात. जिवंतपणीच लेकीला मरणाच्या यातना देणा-यांनी या दोन बहिणींच्या प्रेमाचा आदर्श घ्यावा हेच या रक्षाबंधनातुन सांगावं लागेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Motivation : सकाळी स्वत:ला या ५ सवयी लावा, आयुष्यात खुप पुढे जाल

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

SCROLL FOR NEXT