Pune Drug Case News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Breaking News : पुणे ड्रग्ज प्रकरणात गुन्हे शाखेचे दोन पोलीस अधिकारी निलंबित, अमितेश कुमार यांची मोठी कारवाई

Pune Drug Case News : पुणे ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Satish Daud

पुणे ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे. ⁠पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने आणि ⁠सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, अशी निलंबित पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. ⁠केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी X अकाउंटवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील 'एल ३-लिक्विड लीजर लाउंज' पब बारमध्ये काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. रविवारी (ता. २३) पहाटेपर्यंत चाललेल्या धांगडधिंगा पार्टीचा व्हिडीओ देखील समोर आला होता.

या संपूर्ण प्रकारानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. या प्रकरणात आतापर्यंत पबचालकासह ५ जणांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर पोलिसांनी संबंधित पब, बार सील केला आहे तसेच याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मंत्री मोहोळ यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित, अशी पोस्ट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. "पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपल्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून ज्या हद्दीतील हा प्रकार आहे, त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

"निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केली आहे. सर्व महाविद्यालये, पब्स, हॅाटेल्स, संशयास्पद ठिकाणं येथे त्वरीत ही शोधमोहिम कडक कारवाईसह करण्यात यावी आणि अंमली पदार्थ पुणे शहरात उपलब्ध होतात कसे? याच्या मुळाशी पोहचण्यासाठी प्रभावी तपास मोहिम सुरू करण्यात यावी, अशाही सूचना दिल्या आहेत", असंही मंत्री मोहोळ म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT