Pune Police  Saam TV
मुंबई/पुणे

ATS and Pune Police Detain 2 persons : पुण्यात ATS मोठी कारवाई, देशविरोधी कृत्याच्या संशयावरून दोघे ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. देशविरोधी कृत्याच्या संशयावरून पुण्यातून दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. पुण्यात ATS नी कारवाई केली आहे. एटीएससह पुणे पोलीसही या कारवाईत सहभागी आहेत.

देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यातील कोथरूड परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर एक आरोपी फरार आहे. काल मध्यरात्री दोन्ही तरुणांना ATS ने ताब्यात घेतलं. (Pune Latest News)

दोघा तरुणांना शहर पोलिसांनी संशयावरुन मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आल्याने शहर पोलीस दलाने ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला कळवली.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन परप्रांतीय तरुण २५ ते ३० वयोगटातील आहेत. त्यांच्याकडे जिवंत काडतुसे मिळाली, मात्र पिस्तुल मिळाले नाही. त्यांच्याकडील लॅपटॉपची पाहणी केल्यावर त्यात काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली आहेत

(Live Marathi News)

त्यांचा कोणत्या दहशतवादी कृत्यामध्ये हात असू शकतो, हे लक्षात घेऊन ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला कळवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एटीएस, गुप्तचर यंत्रणा त्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत. तपास यंत्रणा प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT