Mumbai Pune Expressway Accident, Chembur, archana raut. Saam tv
मुंबई/पुणे

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; चेंबूरची युवती ठार; पाच जखमी

हे दाेन्ही अपघात मध्यरात्री झाले. अंधार असल्याने मदत कार्यात अडचण निर्माण झाली.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

रायगड (mumbai pune expressway latest news) : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (mumbai pune expressway) दोन वेग वेगळ्या अपघातात (accident) दोन जण ठार झाले असून पाच जण जखमी (injured) झाले आहेत. हे दोन्ही अपघात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुणे लेनवर खालापुर पोलिस ठाणे हद्दीत झाले आहेत. या अपघातात ठार झालेली व्यक्ती चेंबूर येथील एका युवती असल्याची माहिती पाेलीसांनी दिली. (mumbai pune expressway accident latest marathi news)

हे दाेन्ही अपघात पुणे लेनवर मध्यरात्रीच्या सुमारास झाले आहेत. या अपघातामधील जखमींवर एमजीएम रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत. यामधील एक अपघात हा चार चाकी आणि गॅस टँकर यांच्यामध्ये झाले. या दाेन्ही वाहनांची भाषण धडक झाली. या अपघातात एका युवतीचा मृत्यु झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव अर्चना राऊत (archana raut) असे आहे. ती चेंबूर (chembur) येथील रहिवासी हाेती. तसेच नथु रघु मळेकर, रंजना संतोष खोपडे, गोपाळ गणपत मळेकर, दिपक सदाशिव काटकर आणि देवीदास घोलप हे या अपघातात जखमी झाले आहे आहेत असे पाेलीसांनी सांगितले.

दुसऱ्या अपघातात अज्ञात वाहनाने एका पादचार्‍याला (pedestrian) उडवले आहे. या अपघातात पादचा-याचा मृत्यू झाला आहे. संबंधित पादचा-याची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान दाेन्ही अपघातामधील दोन्ही मृतदेह खालापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात (khalapur primary health center) शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT