Kasara Ghat Accident News Saam tv
मुंबई/पुणे

Kasara Ghat Accident News : कसारा घाटात 300 फूट दरीत मालवाहतुक गाडी काेसळली, दाेन ठार

या अपघातात आणखी काेण जखमी किंवा मृत्यूमुखी पडले आहेत का याचा तपास पाेलीस करीत आहेत.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Shahapur News : कसारा घाटात बुधवारी रात्रीच्या सुमारास 300 फूट खाेल दरीत मालवाहतुक काेसळून चालकासह अन्य एकाचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली हाेती. आज सकाळी पुन्हा अपघातग्रस्तस्थळी पाेलीसांनी अपघातग्रस्त भागाची पाहणी केली.  (Maharashtra News)

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन आणि पाेलीसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार शहापूर तालुक्यातील कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या मालवाहतुकीची गाडी कसारा घाटतील हिवाळा ब्रिज जवळ चालकाचा नियंत्रण सुटल्याने 300 फुट दरीत कोसळली.

या अपघातामधील (accident) चालकाचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन सदस्यांच्या मदतीने पाेलीसांनी दरीतून बाहेर काढला. त्यानंतर आज सकाळी आणखी एकाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात पाेलीसांना यश आले आहे.

दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सदस्यांसमवेत कसारा पोलिस दरीत उतरले आहेत. ते आणखी काही जण या अपघातामुळे जखमी किंवा मृत्यूमुखी पडले आहेत का याचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक; दरात मोठी घसरण

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं ५६व्या वर्षी निधन; दीर्घ आजाराशी झुंज अपयशी, सावत्र मुलाने लिहिली भावूक पोस्ट

Shiv Sena Case Live Update : शिंदेंना 'मुख्य नेता' पद दिलं कुणी?, कपिल सिब्बल यांच्या एकाच प्रश्नाने सुप्रीम कोर्टात खळबळ

Crime: माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते, तरुणाने जन्मदात्या आईला संपवलं, नवी मुंबईतील संतापजनक घटना

मुलांच्या क्रिएटिव्हिटीला द्या पंख, १५ ऑगस्टनिमित्त घरी आणि शाळेत बनवा सुंदर 5 क्राफ्ट

SCROLL FOR NEXT