मुंबई: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link) येथे मे महिन्यात झालेल्या एका अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. या अपघातात एका टॅक्सीच्या धडकेत (Car Accident) दोन जण हवेत काही अंतरावर फेकले गेल्याचे पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. ही घटना ३० मे ची असून एका जखमी गरूडाला (Eagle) वाचवण्याच्या नादात सी लिंकवर हा प्रकार घडला. वांद्रे-वरळी सी लिंकवर एक गरुड जखमी अवस्थेत पडले होते. त्या गरुडाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. (Two Death In Unfortunate accident while trying to rescue an injured eagle On Bandra Worli Sea Link Mumbai Video Viral)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंक येथे ३० मे २०२२ ला एक गरुड जखमी अवस्थेत पडले होते. त्यावेळी प्राणीप्रेमी असलेले अमर मनीष जरीवाला यांच्या ते निदर्शनास आले. अमर हे ३० मे रोजी मालाडला काही कामानिमित्त सी लिंकमार्गे जात होते. यावेळी त्यांच्यासोबत श्याम सुंदर कामत हे देखील होते. त्यावेळी सी लिंकवर त्या गरुडाला जखमी अवस्थेत पाहून अमरने यांनी लगेचच श्याम यांनी गाडी थांबवण्यास सांगून ते गरुडाच्या मदतीला गेले. यावेळी श्यामही अमरच्या मदतीसाठी गाडीखाली उतरले. गरुडाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचेही मागून येणाऱ्या वाहनांकडे लक्ष नव्हते. इतक्यात एक भरधाव वेगाने जात असलेल्या टॅक्सीने दोघांनीही जोरदार धडक दिली.
या जोरदार धडकेत प्राणीप्रेमी अमर मनीष जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला. तर यातील दुसरे जखमी व्यक्ती श्याम सुंदर कामत याचंही नुकताच उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. एका गरुडाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन माणसांचे प्राण गेले आहेत. दोघांच्याही मृत्यूने त्यांच्या परिवारांत शोककळा पसरली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.