Pune Crime News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime News : मस्करीची झाली कुस्करी; चहा पिताना वाद, दोघा भावांसोबत घडलं भयंकर

Pune Police: याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये आणखी एका घटनेने पुणे हादरले आहे. पुण्यामध्ये शुल्लक कारणावरुन दोन भावांवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. पुण्यातल्या धनकवडी परिसरात (Dhankawadi Area) ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात चहा पित असताना मस्करीतून झालेल्या वादातून दोन भावांवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. ४ ते ५ जणांच्या टोळक्याकडून या दोघांवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. पुण्यातल्या धनकवडी परिसरात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

या कोयता हल्ल्यामध्ये ऋषी बर्डे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी त्याचा भाऊ आदित्य राजेंद्र बर्डे याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सिध्देश चोरघे, ओम सावंत, आदित्य गोसावी, राज परदेशी आणि सोन्या खुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऋषी आणि त्याचा भाऊ आदित्य हे भारती विद्यापीठाजवळ एका चहाच्या दुकानात त्यांच्या मित्रांसोबत चहा पित बसले होते. यावेळी आदित्यने सिद्धेश चोरघे याची मस्करी केली. मात्र या मस्करीचे रूपांतर वादात झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की सिद्धेशने त्याच्या इतर साथीदारांना घेऊन आदित्य आणि ऋषी यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT