Ulhasnagar Crime News: बाळाला औषध देऊन निवांत झोपली, सकाळ होताच विपरीत घडलं, सोन्यासारखं लेकरू आईपासून दुरावलं

Crime News: बाळाच्या मृत्यूने त्याच्या आई-बाबांनी रुग्णालयात टाहो फोडला. या प्रकरणी डॉक्टरांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
Crime News
Crime NewsSaam TV
Published On

Ulhasnagar News: सरकारी रुग्णालयातून इंजेक्शन घेतल्यानंतर काही तासातच दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचा आरोप पालकांनी केला आहे. बाळाच्या मृत्यूने त्याच्या आई-बाबांनी रुग्णालयात टाहो फोडला. या प्रकरणी डॉक्टरांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. (Latest Crime News)

उल्हासनगरच्या (Ulhasnagar) कॅम्प पाच भागात राहणाऱ्या काजल सावंत यांना दोन महिन्यांची मुलगी होती. मंगळवारी दुपारी त्यांनी उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळाला इंजेक्शन देण्यासाठी नेलं. यावेळी बाळाच्या दोन पायांवर दोन आणि हातावर एक असे ३ इंजेक्शन तिथल्या डॉक्टरांनी दिले. तसंच बाळाला ताप येऊ नये यासाठी एक गोळी सुद्धा रात्री झोपताना देण्यास सांगितली.

Crime News
Jalna Crime News: प्रेमाची फूस लावून शिक्षकानेच बारावीच्या विद्यार्थिनीला पळवलं; बदनापूर तालुक्यातील धक्कादायक घटना

त्यानुसार काजल सावंत यांनी बाळाला इंजेक्शन घेऊन घरी नेलं आणि रात्री झोपताना गोळीचा तुकडा बाळाला दिला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बाळाच्या नाकातून फेस आणि रक्त येऊ लागलं. यावेळी काजल यांच्यासह घरातील सर्वजण झोपले होते. पहाटे उठल्यानंतर ही बाब काजल सावंत यांच्या लक्षात येताच त्यांनी बाळाला मध्यवर्ती रुग्णालयात आणलं.

मात्र डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मंगळवारी दुपारी बाळाला इंजेक्शन दिल्यानंतर रात्रीपर्यंत बाळ सुखरूप होतं. मात्र रात्री गोळी दिल्यानंतरच बाळाचा मृत्यू झाल्यामुळे एक तर चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे किंवा जास्त पावरची गोळी दिल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला असावा, असा आरोप काजल सावंत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Crime News
Pune Crime News: 'बघ आपून काय केलंय' निर्घृण हत्या करुन व्हिडिओ मित्रांना पाठवले; ३ अल्पवयीन आरोपींना अटक

याप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली असून अन्य बालकांसोबत असा प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर बनसोडे यांना विचारलं असता त्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com