Drown, Bhiwandi Saam TV
मुंबई/पुणे

Bhiwandi News : दुर्दैवी! १२ वर्षीय मुलीसोबत ८ वर्षांचा मुलगा मित्रांसोबत तलावावर पोहायला गेला, दोघेही परतले नाहीत...

Bhiwandi News : भिवंडीत दुर्दैवी घटना घडली. ८ वर्षीय मुलगा आणि त्याच्यासोबत असलेल्या १२ वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाला.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Bhiwandi News : मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या एका बालकाचा आणि मुलीचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी उशिरा भिवंडी तालुक्यातील धामणगाव येथे घडल्याची माहिती पाेलीसांनी दिली. या घटनेत वसीम मलिक (वय 7 राहणार. फातिमा नगर) व अंजुम फत्ते मो.रफिक (वय 12 राहणार. धामणगाव धापशी पाडा) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलीसांनी दिली. (Maharashtra News)

पाेलीसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती नुसार भिवंडी शहरातील फातिमा नगर येथील आठ वर्षांचा वसीम हा तालुक्यातील वडपा धामण गाव धापशीपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी वसीम आपली नातेवाईक असलेली बारा वर्षांची मुलगी अंजुम व इतर दोन साथीदारांसह वडपा धामणगाव येथे तलावात पोहोचण्यासाठी उतरले.

यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी बाजूला उभ्या असलेल्या दोन साथीदारांनी आरडाओरड केल्याने तेथून जाणाऱ्या एका वाहन चालकाने मुलांचा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली. त्याने पाण्यातून मुलांना बाहेर काढत उपजिल्हा रुग्णालयात (hospital) दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.

या घटनेत वसीम मलिक (वय 7 राहणार. फातिमा नगर) व अंजुम फत्ते मो.रफिक (वय 12 राहणार. धामणगाव धापशी पाडा) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलीसांनी दिली. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT