तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी सोडवला पार्किंगचा प्रश्‍न Saam Tv
मुंबई/पुणे

तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी सोडवला पार्किंगचा प्रश्‍न

ऑनलाइन बुकींगद्वारे पार्किंग, शुल्क व्यापारी देणार

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे - तुळशीबागेत खरेदीला जायचे आहे, पण ग्राहकाला सर्वात आधी प्रश्‍न पडतो तो गाडी कुठे लावायची? या समस्येवर आता तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी उत्तर शोधून काढले आहे. महालक्ष्मी मेट्रो सोसायटीचे २१५ वाहने लावण्याची क्षमता असलेले पार्किंग नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महालक्ष्मी मेट्रो सोसायटीत गाडी लावायची आणि त्याचे पैसे व्यापारी देणार. त्यामुळे पुणेकरांना आता बिनधास्त खरेदी करता येणार आहे.

तुळशीबाग व्यापारयांनी पार्किंग हब’ नावाने एक अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या साह्याने तुळशीबाग व्यापारी असोसिएशनने नागरिकांना घरातून ऑनलाइन पार्किंगचा स्लॉट उपलब्ध करून दिला आहे. जोगेश्‍वरी गल्लीतील महालक्ष्मी मेट्रो या सोसायटीची पार्किंग या ॲपद्वारे जोडली गेली आहे. या ठिकाणी २०० दुचाकी आणि १५ कार पार्क करण्याची व्यवस्था आहे.

हे देखील पहा -

इतकेच नाही तर या ठिकाणी इलेक्ट्रीक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा देखील करण्यात आली आहे. याचप्रमाणे मध्यवर्ती बाजारपेठेतील सोसायट्यांचे पार्किंग, शाळांचे मैदाने उपलब्ध करण्यासाठी व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. यातून सोसायट्यांना देखील उत्पन्नाचे साधन मिळणार आहे. भविष्यात शनिपार असोसिएशन, अप्पा बळवंत चौक पुस्तक विक्रेते संघटना, गणपती चौक लक्ष्मी रोड व्यापारी असोसिएशन,स्टेशनरी कटलरी ॲण्ड जनरल मर्चंट असोसिएशन, रविवार पेठ कापडगंज, बोहरे आळी व्यापारी असोसिएशन या व्यापारी संघटनांशी चर्चा करुण त्यांनाही या योजनेत सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तसेच बाजारपेठेतील महापालिकेसह इतर खासगी पार्किंगच्या ठिकाणावरून पुण्य दशम बससेवा सुरु करावी, त्यामुळे ग्राहक गाडी लावून बाजारपेठेत बसने फिरू शकतात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. तुळशीबागेत येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगची सुविधा मिळावी यासाठी ही योजना राबविली जाणार आहे. यातून आमचा व्यापार देखील वाढेल. मध्यवर्ती भागात अशाप्रकारे पार्किंग उपलब्ध व्हावेत यासाठीही आमचा प्रयत्न आहे अस नितीन पंडित यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Election : महाविकास आघाडी फुटली; मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

SCROLL FOR NEXT