Nalasopara, Arrests, Tulinj Police Station
Nalasopara, Arrests, Tulinj Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News : शाळांसह मुख्याध्यापकांच्या नावाचे शिक्के जप्त, बनावट कागदपत्रांसह दाेघांना अटक

चेतन इंगळे

Tulinj Police Station : बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात तुळींज पोलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी (police) दाेन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. दाेन्ही संशयितांना पाेलिसांनी अटक (arrest) केली आहे. (Maharashtra News)

नालासोपारा (nalasopara) पूर्वेकडील परिसरात बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही टोळी प्रसिद्ध शाळांचे (school) बनावट वास्तव्य प्रमाणपत्र बनवून लोकांना पासपोर्ट बनवण्यासाठी विकत असे. तुळींज पोलिसांनी (tulinj police) या प्रकरणाचा छडा लावला आहे.

नालासोपाऱ्याच्या रेहमत नगर येथील असराफ खान याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्टसाठी ऑनलाइन फॉर्म सादर केल्यावर ही बाब निदर्शनास आली आहे. त्यानंतर हे कागदपत्र पासपोर्ट विभागाकडून पडताळणीसाठी तुळींज पोलिस ठाण्यात पोहोचले.

तेव्हा तुळींजच्या गोपनीय विभागाला त्या व्यक्तीच्या शाळेतील वास्तव्याचा दाखला संशयास्पद वाटला. शाळेच्या त्या प्रमाणपत्राची खात्री करण्यासाठी गोपनीय विभागातील पोलिसांनी शाळेशी संपर्क साधला. शाळेने संबंधित प्रमाणपत्र हे आमच्या शाळेचे दाखवित असले तरी ते बनावट असल्याचे पाेलिसांना सांगितले.

त्यानंतर पोलीस हवालदार विक्रम पन्हाळकर यांनी कागदपत्रे देणाऱ्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून त्याची कसून चौकशी केली. त्यात ही कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. त्यांनी नालासोपारा स्थानकाजवळील एका झेरॉक्सच्या दुकानातून एजंटकडून ती २ हजार रुपयांना खरेदी केल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या एजंटच्या दुकानावर छापा टाकला. तेथून पोलिसांना आणखी तीन बनावट शाळांचे प्रमाणपत्र मिळाले. तसेच त्या दुकानातून प्रसिद्ध शाळांचे शिक्के, मुख्याध्यापकांच्या नावाचे शिक्के आणि इतर अनेक बनावट कागदपत्रेही जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या शादाब आणि बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या असराफ खानला अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Loksabha Election : रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुखने बजावला मतदानाचा हक्क, लातूरमध्ये सहकुटुंब केलं मतदान

नागपूर शहरात सलग तीन दिवस भूकंपाच्या धक्क्याची नोंद, अफवांवर विश्वास ठेवू नका : भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग

Raigad Lok Sabha Votting Live: बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Google Pixel 8a: गुगल करणार Pixel 8 सीरीजचा सर्वात स्वस्त फोन लाँच; फीचर्स झाले लीक

Breakfast Recipe: नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी दुधीची खास रेसिपी

SCROLL FOR NEXT