FDA Raids Ayurvedic Centres Across Maharashtra Saam TV
मुंबई/पुणे

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

FDA Raids Ayurvedic Centres Across Maharashtra: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यभरात एफडीएने आयुर्वेदीक सेंटरवर कारवाई करत तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा औषधसाठा जप्त केला.

Priya More

तुकाराम मुंढे यांची मोठी कारवाई
महाराष्ट्रात आयुर्वेदिक केंद्रांवर एफडीएचे छापेमारी
भ्रामक औषध जाहिरातींवर एफडीएची कारवाई
दिव्या फार्मसी औषधसाठा जप्त

संजय गडदे, मुंबई

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात भ्रामक औषध जाहिराती आणि नियमभंग करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. ‘औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४’ अंतर्गत राज्यातील सात विभागांमध्ये एकाच वेळी छापेमारी करत तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला.

बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील १२ आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली. गंभीर आजारांवर हमखास उपचार, चमत्कारिक परिणाम आणि प्रतिबंधित दावे करणाऱ्या जाहिरातींमुळे नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. या कारवाईत ‘दिव्या फार्मसी, हरिद्वार’ या उत्पादकाच्या विविध औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

कोकण विभागात सर्वाधिक १८ लाख ५८ हजार रुपयांचा साठा जप्त झाला, तर पुणे विभागात १४ लाख ६८ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय पुणे विभागातच मिसब्रँडेड अलोपॅथी औषधांचा तब्बल २१ लाख ८३ हजार रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला. “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक जाहिराती, अवैध औषध उत्पादन आणि विक्रीविरोधातील कारवाई आणखी कठोर करण्यात येईल,” असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

दरम्यान, नागरिकांनी स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नयेत तसेच संशयास्पद औषधे किंवा भ्रामक जाहिरातींबाबत तातडीने एफडीएकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांसाठी लवकरच विशेष मोबाईल ॲप आणि टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही एफडीएने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा 24K, 22K आणि 18K चे ताजे दर

Maharashtra News Live Update: ठाण्यातील ब्रम्हांड परिसरात सदनिकेचा काही भाग कोसळला

स्वातंत्र्यदिनानिमित्त घरच्या घरी बनवा तिरंग्याच्या रंगातील 5 रेसिपी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील

Pune : पुण्यात भोंदू बाबाचं किळसवाण कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; मांडीवर बसवलं अन्...

Sri Lanka cricket: श्रीलंकेत क्रिकेट कोचच्या हत्येने खळबळ; खेळाडूंसोबत भांडणानंतर नेमकं काय घडलं? क्रिकेटपटू अटकेत

SCROLL FOR NEXT