Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

तुकाराम महाराज उर्जास्त्रोत, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली - PM मोदी

'ज्या शिळेवर स्वत: तुकाराम महाराज बसले, त्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्याचा मान मिळाला हे माझं भाग्य'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

पुणे : श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू नगरित आले होते. त्यांनी मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी तुकाराम महाराजांच्या कार्याबद्दल गौरोवद्गार काढले.

पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले, 'सर्व संताच्या चरणावर मी कोटी कोटी वंदन करतो. मनुष्य जन्म मिळंण हे दुर्लभ आहे तसंच मनुष्याचा जन्म भेटल्यानंतर संताचा सहवास देखील दुर्लभ असतो. मात्र, मला या संतमेळ्याव्यामध्ये यायला मिळालं, देहुला यायला मिळालं हे मी माझं सौभाग्य समजतो.

देहु ही संतशिरोमणी तुकाराम महाराजांची (Tukaram Maharaj) जन्मभूमी, कर्मभुमी आहे. काही महिन्यांपुर्वी मी पालखी मार्गासाठी बनविण्यात येत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भुमिपुजन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचं सौभाग्य मिळालं. या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम टप्प्या टप्प्याने पुर्ण होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे देखील पाहा -

ते पुढे म्हणाले, 'ज्या शिळेवर स्वत: तुकाराम महाराज बसले त्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्याचा मान मिळाला हे माझ भाग्य आहे. या पवित्र जागेवरती मंदीराची निर्मिती केल्याबद्दल मंदीर समितीचे पंतप्रधानांनी आभार मानले. यावेळी त्यांनी तुकाराम महाराजांनी देशातील उपासमारी, दुष्काळ बघीतला या काळात त्यांनी आपल्या घरातील संपत्ती लोकांना वाटली. ही शिळा म्हणजे तुकाराम महाराजांच्या त्यागाचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले.

जो भंग होत नाही जे नेहमी शाश्वत राहते ते म्हणजे अभंग असतो. आजही देश सांस्कृतिक मुल्यांच्या आधारे पुढे जात असताना अभंग आपणाला उर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुषांच्या जीवनामध्येही तुकाराम महाराजांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तसंच स्वातंत्र्यवीर सावरक अंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगत होते त्यावेळी ते तुकाराम महाराजांचे अभंग गायचे, लोक वेगवेगळे असले तरी तुकाराम महाराजांची उर्जा समान होती असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT