एनसीबीच्या कारवाईला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न? Saam Tv News
मुंबई/पुणे

एनसीबीच्या कारवाईला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न?

या प्रकरणात नवाब मलिक 'खान' हे नाव समोर आहे म्हणून या गुन्ह्यांबाबत बोलत आहेत. सुशांत सिंहच्या वेळी का पुढे येऊन बोलले नाही. असं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे.

सुरज सावंत

मुंबई: कार्डिलिया क्रूझ प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत असताना. या प्रकरणातही आता राजकिय नेत्यांनी उड्या घेतलेल्या आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आमदार नितेश राणेंनी यात उडी घेतलेली पहायला मिळते. नितेश राणे यांच्या ट्विटमुळे या प्रकरणाला धार्मिक वळण मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. (Trying to give a religious twist to the NCB’s action?)

हे देखील पहा -

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत नेमकं याच प्रकरणात का बोलत आहेत. सुशांत प्रकरणात का नाही पत्रकार परिषद घेतली असा प्रश्न केला. एवढ्यावरच न थांबता नितेश राणेंनी या प्रकरणात नवाब मलिक 'खान' हे नाव समोर आहे म्हणून या गुन्ह्यांबाबत बोलत आहेत. सुशांत सिंहच्या वेळी का पुढे येऊन बोलले नाही. कारण सुशांत हिंदू असल्याने त्याला व्यसनाधीन ठरवण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातही असाच राजकिय नेत्याचा हस्तक्षेप पहायला मिळाला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या, त्यावेळी तर या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिस, सीबीआय, मुंबई गुन्हे शाखा, ईडी आणि एनसीबीने केला. मात्र पाच तपास यंत्रणांनी गुन्ह्याचा तपास करूनही सुशांतच्या आत्महत्येचे राजकारण झाले, मात्र आत्महत्येचे कारण आजही गुलदस्त्यात आहे.

मात्र नितेश राणेंच्या या ट्विटनंतर कार्डिलिया क्रूझ प्रकरणात ​एनसीबीच्या कारवाईला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असताना राजकीय टीका टिप्पणी करुन त्याला धार्मिक रंग देणं योग्य नसल्याचे मत मुस्लिम विचारवंत अस्लम खोत यांनी मांडलेलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: जावयाला सासऱ्याच्या संपत्तीत वाटा मिळतो का?

Maharashtra Dasara Melava Live Update: जालन्यात धनगर आरक्षणासाठी सुरू असलेलं दिपक बोऱ्हाडे यांच आमरण उपोषण स्थगित.

Aadhar Card Update Charges : आधार कार्ड अपडेटसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार, आता शुल्क किती रुपयांनी वाढलं?

Skin Care: दररोज सनस्क्रीन लावल्याने त्वचेवर कोणते परिणाम होतात?

Kantara Chapter 1 Review: ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT