Pune News
Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळून ट्रेकरचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

पुणे - सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ट्रेकरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कल्याण दरवाज्या जवळ तटबंदीच्या खालच्या भागातील दरड पायवाटेवर कोसळल्याची घटना काल घडली होती. दुर्दैवाने ढिगाऱ्याखाली सापडून हेमंग लागा वय 27 या ट्रेकरचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक नागरिकानी अथक प्रयत्न केल्यानतर आज पहाटे हेमंगचा मृतदेह सापडला. दाट धुके असताना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चार ते पाच ट्रेकर्स थोडक्यात बचावले आहे. मात्र एक जण बेपत्ता झाला होता.

हे देखील पाहा -

शनिवारी सकाळी दाट धुके असताना 9च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. बराच वेळ झाला तरी गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या हेमंत यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर हेमंत यांच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर गडावर शोधाशोध केल्यानंतर रात्री उशिरा ही बाब सामोर आली.

काल सकाळी सहा वाजता 'सिंहगड एथिक्स ट्रेक' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे तीनशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. सिंहगड पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी-गोळेवाडी चौक- कोंढणपूरफाटा-कोंढणपूर- कल्याण - कल्याण दरवाजा - नरवीर तान्हाजी मालुसरे समाधी - पुणे दरवाजा - गाडीतळ आतकरवाडी असा या स्पर्धेचा मार्ग होता.काल दरड कोसळल्याने किल्ल्यावरील कल्याण दरवाजाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. हेमंत यांच्या जाण्याने ट्रेकर ग्रुपमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT