Court News  Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News : तीन महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण करुन हत्यारप्रकरणी तृतीयपंथीयाला फाशी; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

तीन महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण करुन अत्याचार करत हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी तृतीयपंथीयाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. २०२१ मध्ये कफ परेड भागात तृतीयपंथीयाने हे संतापजनक कृत्य केलं होतं. पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अदिती कदम यांनी ही शिक्षा सुनावली. (Latest Crime News)

आरोपीने बाळावर अत्याचार करुन हत्या करत पुरावे नष्ट करण्यासाठी बाळाला खाडीत फेकलं होतं. अत्यंत वाईट अशी ही घटना असल्याचं न्यायाधीशांनी निकाल देताना सांगितले. विशेष सरकारी वकील राकेश तिवारी यांनी हा खटला दुर्मिळ असल्याचं म्हणत फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे अनेक ठोस पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते. एका साक्षीदाराने देखील आरोपीला चिमुकलीला घेऊन जाताना पाहिले होते. ज्यामुळे आरोपीनेच चिमुकलीचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली, असं सरकारी वकील राकेश तिवारी यांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं.

आरोपी तृतीयपंथीयांने ८ जुलै २०२१ रोजी कफ परेड परिसरात फिरताना चिमुकलीच्या घरी जात आर्शीवाद दिले होते. त्यानंतर घरच्यांकडे साडी, नारळ आणि पैशांची मागणी केली. मात्र बाळाच्या घरच्यांनी परिस्थिती नसल्याचं सांगून नकार दिला होता. मात्र काहीही न दिल्याने तृतीयपंथीयाने तिथेच वाद घातला होता. रागाच्या भरात याचा बदला घेण्यासाठी आरोपीने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झालं.

पोलिसांनी तृतीयपंथी आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 376 (बी, डी), 363 201,34 आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. आरोपीला अटक केल्यापासून तुरुंगातच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT