Shocking Incident in Bandra-Mahim Saam
मुंबई/पुणे

ट्रान्सजेंडर अन् तरूणामध्ये फोटोवरून वाद; दोघांनी माहीम खाडीत मारली उडी, बचाव पथकाचा शोध सुरू

Shocking Incident in Bandra-Mahim: वांद्रे माहीम परिसरात ट्रान्सजेंडर आणि तरूणामध्ये वाद झाला. वाद चिघळल्याने ट्रान्सजेंडरने आधी खाडीत उडी मारली. नंतर तरूणाने तिला वाचवण्यासाठी उडी मारली. सध्या दोघांचा शोध सुरू आहे.

Bhagyashree Kamble

  • महिम खाडी परिसरातून धक्कादायक बातमी

  • फोटो-मेसेजवरून ट्रान्सजेंडर आणि तरुणामध्ये वाद

  • आधी ट्रान्सजेंडर नंतर तरूणाने उडी मारली

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फोटो आणि मेसेजवरून झालेल्या वादातून ट्रान्सजेंडर आणि तरूणामध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद चिघळल्याने ट्रान्सजेंडरने माहिम खाडीमध्ये उडी मारली. ट्रान्सजेंडरला वाचवण्यासाठी तरूणानंही खाडीमध्ये उडी मारली. दोघांचा अद्याप शोध लागलेला नाही. बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वांद्रे माहीम खाडी परिसरात दुपारी सुमारे १२:३० वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. कलंदर अल्ताफ खान (वय वर्ष २०) आणि ट्रान्सजेंडर (वय वर्ष २०) असे माहिम खाडीमध्ये उडी घेणाऱ्या दोन्ही व्यक्तींची नावे आहेत. दोघेही वांद्रा लालमट्टी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

दोघांमध्ये मोबाईलवरील फोटो आणि काही मेसेजवरून वाद झाला होता. वाद विकोपाला गेला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद चिघळल्याने ट्रान्सजेंडर व्यक्तीने माहिम खाडीत उडी मारली. ट्रान्सजेंडरने उडी मारली असल्याचं पाहताच कलंदर अल्ताफ खान याने तिला वाचवण्यासाठी माहिम खाडीत उडी मारली.

मात्र, दोघेही खाडीमध्ये बुडाले असल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांनी वर्तवला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथकाने घडनास्थळी धाव घेतली. तसेच तपास आणि शोधमोहिमेला सुरूवात केली. अद्याप दोघेही पोलीस आणि बचाव पथकाला सापडले नाहीत. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचे घोटाळे बाहेर काढणार! अंजली दमानियांचा थेट इशारा|VIDEO

PPF Calculation: निवृत्तीनंतरही दरमहा ₹1 लाख मिळवायचे आहेत? पीपीएफचं जबरदस्त गणित समजून घ्या

Maharashtra Politics : महायुती फिस्कटली, पण नवीच आघाडी उदयास आली; बदलापूरचं राजकारण फिरलं

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ; शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Konkan Food : कोकण स्पेशल 'वाटपाची डाळ', चाखाल अस्सल गावरान चव

SCROLL FOR NEXT