शिवडी स्थानकाचा कायापालट; जुन्या खराब भिंतींना रंगरंगोटी करत सामाजिक संदेश  जयश्री मोरे
मुंबई/पुणे

शिवडी स्थानकाचा कायापालट; जुन्या खराब भिंतींना रंगरंगोटी करत सामाजिक संदेश

शिवडी स्टेशनच्या ज्या भिंतींवर पानाच्या पिचकाऱ्या उडायच्या त्याच भिंतींवर सध्या आकर्षक चित्र, बोधचिन्ह, संदेश देणारी माहिती झळकू लागलेली आहे.

जयश्री मोरे

मुंबई : अस्वच्छतेच्या गर्तेत अडकलेल्या शिवडी स्टेशनने (sewri railway station) कात टाकली आहे. 2013 मध्ये किंग्ज सर्कल स्थानकाला स्वच्छतेचा एका उच्चतम दर्जा मिळवून दिल्यानंतर सिन्हा यांचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला होता. त्यानंतर लॉकडाऊन सुरू होताच फेब्रुवारीमध्ये शिवडी स्थानकावर नियुक्त झाल्यानंतर घाणीचे साम्राज्य पसरलेल्या शिवडी रेल्वे स्थानकाचा सिंन्हा यांनी चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे. (Transformation of Shivadi railway station; Social messages and beautiful paintings on the walls)

हे देखील पहा -

शिवडी स्टेशनच्या ज्या भिंतींवर पानाच्या पिचकाऱ्या उडायच्या त्याच भिंतींवर सध्या आकर्षक चित्र, बोधचिन्ह, संदेश देणारी माहिती झळकू लागलेली आहे. स्टेशन मास्तर एन. के. सिन्हा यांच्या प्रयत्नातून शिवडी स्थानकाचं रुप पालटलंय. अधिकारी-कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत शिवडी स्टेशन दुर्गंधी आणि घाणीपासून मुक्त करण्यात आलं आहे.

'मुंबईरत्न' पुरस्काराने सन्मान

हार्बर मार्गावरील किंग सर्कल आणि शिवडी रेल्वे स्थानकाला अस्वच्छतेतून स्वच्छतेच्या यादीत आणणाऱ्या शिवडी स्थानकाचे व्यवस्थापक नितेश कुमार सिन्हा यांचा नुकताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्या हस्ते 'मुंबईरत्न' (Mumbai Ratna) पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हार्बर मार्गावरील अस्वच्छ स्थानकांच्या यादीतून वगळून स्वच्छ स्थानकांच्या यादीत सुवर्णाक्षराने शिवडी स्थानकाचे नाव झळकू लागले आहे. यामागे सिन्हा यांची मेहनत आणि जिद्द कामी आली आहे. सिन्हा यांनी हे सगळं स्वतःच्या पैशाने केलं. समाजाप्रती त्यांची ही बांधिलकी पाहून समाजसेवी संस्था सुद्धा पुढे सरसावल्या आणि त्यांनी वरदहस्ताने शिवडी स्टेशनचा कायाकल्प बदलण्यासाठी नितेश सिन्हा यांना मदत केली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 'मुंबईरत्न' पुरस्काराने सन्मान

वारली चित्र प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू

शिवडी रेल्वे स्थानकावरील भिंती आता बोलक्या झाल्या आहेत. भिंतींवर विविध संदेश (Social Messeges) देणारे चित्र रंगवण्यात (Paintings) आले असून, स्थानकाची दैनंदिन साफसफाई सुद्धा केली जात आहे. पादचारी मार्गावरील पायऱ्यांनाही विविध चित्रांद्वारे रंगवण्यात आल्याने ते प्रवाशांना आकर्षित करत आहे. तर भिंतींवरील रंगीत वारली चित्र (warli painting) प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. त्याशिवाय स्थानकावर घाण करणाऱ्यांना आणि थुंकणाऱ्यांनाही दंडात्मक कारवाईचा धडाका लावल्याने, स्थानकावरील घाण आटोक्यात आणण्याचा सिन्हा यांचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. मात्र, सिन्हा यांनी लाॅकडाऊन पुर्वीच शिवडी रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर पदाचे सुत्र सांभाळल्यानंतर स्थानकाची स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली.

मनात जनसेवेचा वसा असल्यास माणूस काहीही करू शकतो. याच एका वाक्यातून प्रेरणा घेऊन आज पर्यंत कर्तव्यावर असलेल्या स्थानकांना एन. के. सिन्हा यांनी आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT