Pune Accident Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Accident: भीषण अपघात! महाविद्यालयात जाताना तरुणीसोबत भयंकर घडलं; सिमेंट मिक्सर ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू

Tragic Road Accident Near pune: सिंहगड रस्त्यावरील भीषण अपघातात सई भागवत या २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेनंतर ती ट्रकखाली चिरडली गेली. चालक फरार असून तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना पुणे सिंहगड हिंगणे परिसरातून उघडकीस आली आहे. तरूणी आपल्या वाहनातून महाविद्यालयाच्या दिशेनं जात होती. नंतर तिच्या वाहनाला सिमेंट मिक्सरच्या ट्रकचा धक्का बसला. यामुळे ती वाहनासह रस्त्यावर पडली. त्यात ती सिमेंट मिक्सरच्या ट्रकच्या खाली आल्याने चिरडली गेली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

सई भागवत (वय वर्ष २०) असे मृत तरूणीचे नाव आहे. हिंगण्याकडून सिंहगड महाविद्यालय वडगाव येथे जात असताना तिचा अपघात घडला. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. पावसाळा असलेल्यामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य होतं. तसेच रस्त्यावर सांडपाणीही होतं. ती वाहन घेऊन वडगाव येथील महाविद्यालयाच्या दिशेनं जात होती. सांडपाणी चुकविण्याच्या नादात मागून येणाऱ्या सिमेंट मिक्सरच्या ट्रकचा तरूणी चालवत असलेल्या वाहनाला बसला.

यामुळे ती रस्त्यावर खाली पडली. भरधाव सिमेंट मिक्सरचा ट्रक थेट तिच्या अंगावरून गेलं. या अपघातात तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तरूणीच्या कुटुंबाला याची माहिती दिली. तसेच तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. या घटनेनंतर सिमेंट मिक्सरच्या ट्रकचा ड्रायव्हर फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

या घटनेची गुन्हा नोंदणी करण्यात आली असून, पुढील तपास सिंहगड पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करण्यासाठी CCTV फुटेज, तसेच इतर पुरावे गोळा केले जात आहेत. सईच्या मृत्यूनंतर भागवत कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरातील नागरिकांनी देखील या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

SCROLL FOR NEXT