Tragic Death in Ambernath Saam Tv News
मुंबई/पुणे

कानात हेडफोन लावून रूळ ओलांडनं पडलं महागात, महिलेचा जागीच मृत्यू; वाचवायला गेलेल्या तरूणाचाही अंत

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना हेडफोन लावलेल्या महिलेचा मृत्यू. वाचवण्यासाठी गेलेल्या सहकाऱ्याचाही मृत्यू. स्थानिकांकडून पादचारी पुलाची तीव्र मागणी होत आहे.

Bhagyashree Kamble

अंबरनाथमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कानात हेडफोन लावून रेल्वेचे रूळ ओलांडताना एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान, या महिलेला वाचवण्याासाठी गेलेल्या सहकारी तरुणाचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

ही दुर्दैवी घटना अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ रविवारी सायंकाळी घडली. वैशाली सुनील धोत्रे (वय ४५) आणि आतिष रमेश आंबेकर (वय २९) हे दोघं अंबरनाथ एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत काम करत होते. काम संपवून घरी जात असताना आतिष वैशाली यांना सोडायला मोरीवली गावाजवळ गेला.

यावेळी वैशाली या कानात हेडफोन लावून आणि फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत होत्या. तेवढ्यात समोरून रेल्वे आली. आतिष आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आवाज देऊन सतर्क करण्याचा प्रयत्न केला, पण वैशाली यांचं लक्ष नव्हतं. आतिष त्यांना वाचवण्यासाठी धावत गेला, मात्र तोपर्यंत उशीर झाला. रेल्वेच्या धडकेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

आतिष त्यांच्या कुटुंबाचा आधार होता. त्याच्या दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं. आईवडील वयोवृद्ध आहेत. तर दुसरीकडे, वैशाली यांचा मुलगा २२ वर्षांचा असून एक मुलगी आहे. त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. यंदा मुलीचं लग्न लावण्याच्या तयारीत असतानाच हा आघात कुटुंबावर कोसळला.

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे. मोरीवली गाव ते बी केबीन रोडदरम्यान एक पादचारी पूल किंवा उड्डाणपूल उभारण्याची मागणी वर्षानुवर्षं होत आहे. मात्र रेल्वे प्रशासन डोळे झाकून बसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

April Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बॅंकांना किती सुट्ट्या असणार? RBI ने दिली यादी; वाचा

How To Make Gel Shampoo: या 3 गोष्टींनी घरीच बनवा जेल शॅम्पू, केसांची होईल मुळापासून वाढ

Bihar Politics: मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? बिहारमध्ये भाजपने खेळला मोठा डाव

Ashok Kharat Case: कल्पना खरातच्या मैत्रिणी अन् नोकरांची SIT कडून चौकशी; धक्कादायक खुलासे होणार

Maharashtra News Live Update: अनियंत्रित इंधन टँकरनं पुलाखालील वाहनांना चिरडलं, मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

SCROLL FOR NEXT