Mokhada ZP School Student Pickup Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Accident : मोखाड्यात भयंकर दुर्घटना! विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोचा भीषण अपघात

Mokhada ZP School Student Pickup Accident News : मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी क्रीडा स्पर्धेसाठी पिकअप टेम्पोच्या मागील भागात बसून प्रवास करत असताना भीषण अपघात झाला.

Alisha Khedekar

  • मोखाड्यात पिकअप टेम्पोचा भीषण अपघात

  • चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता

  • गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज

  • जखमींवर नाशिकमध्ये उपचार सुरू

फैय्याज शेख, मोखाडा

पावसाळा संपला की नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा अशा स्पर्धा सुरु होतात. यासाठी शिक्षक देखील तितकीच मेहनत घेतात. मात्र काही वेळेस चुकीचे नियोजन जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना मोखाडा तालुक्यातील झेडपीच्या विद्यार्थ्यांसोबत घडली आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना पिकअप टेम्पो मध्ये मागे बसवून क्रीडा स्पर्धेसाठी घेऊन जात होते. यादरम्यान पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून २ विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोखाडा तालुक्यातील चप्पलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पिकअप टेम्पो मध्ये मागे बसवून क्रीडा स्पर्धेसाठी घेऊन जाण्याचे नियोजन केले. मोखाडा तालुक्यातील सातुर्ली जवळ हा पिकअप टेम्पो येताच त्याचा अपघात झाला. धक्कादायक म्हणजे या पिकअप टेम्पोचा चालक दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यामुळे गाडीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये इयत्ता चौथीत शिकणारे अरूण देविदास लाखन व कुणाल संतोष भोळे या दोन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी नाशिक येथील केळकर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. महत्वाचे म्हणजे या विद्यार्थ्यांना शिक्षकाने एका पिक अप टेम्पो मध्ये मागे बसवून घेऊन जाणे कुठपर्यंत योग्य होते असा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्धा जिल्ह्यात नगर परिषदेत उपाध्यक्ष पदासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

Budhaditya Rajyog: 12 महिन्यांनंतर शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य राजयोग; या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

BMC Election: शिंदेसेनेमुळे भाजपची सेंच्युरी हुकली? भाजपनं फोडलं शिंदेसेनेवर खापर

Elvish Yadav : "सब मान लिया तुझको..."; करोडपती सुंदरीच्या प्रेमात एल्विश यादव? मिठी मारली अन्..., पाहा VIDEO

Kidney cancer: ही ७ लक्षणं दिसली तर समजा किडनीचा कॅन्सर शरीरात करतोय घर; लगेच करून घ्या तपासणी

SCROLL FOR NEXT