Tragic Accident in Sakinaka Ganesh Visarjan Saam tv news
मुंबई/पुणे

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; विजेच्या शॉक लागून तरूणाचा मृत्यू, ४ गंभीर जखमी, रात्री नेमकं काय घडलं?

Tragic Accident in Sakinaka Ganesh Visarjan: साकीनाका खैराणी रोड परिसरात विसर्जन मिरवणुकीत दुर्दैवी अपघात. हाय टेन्शन वायरच्या धक्क्यामुळे एकाचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी.

Bhagyashree Kamble

  • साकीनाका खैराणी रोड परिसरात विसर्जन मिरवणुकीत दुर्दैवी अपघात.

  • हाय टेन्शन वायरच्या धक्क्यामुळे एकाचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी.

  • मृत व्यक्तीचे नाव बिनू शिवकुमार (वय ३६).

  • जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून परिसरात शोककळा.

गणेश विसर्जनाच्या उत्साहात साकीनाका परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खैराणी रोड परिसरात दुर्देवी घटना घडली. श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना ट्रॉलीला हाय टेन्शन वायरमधून करंट बसला. शॉक लागल्यामुळे यात एका तरूणाचा मृत्यू झाला. तर, चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास एसजे स्टुडिओसमोर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसजे स्टुडिओसमोरील खैराणी रोडवरून टाटा पॉवर कंपनीची ११ हजार व्होल्टेजची हाय टेन्शन लाइन जाते. यामधून एक छोटी वायर लटकत होती. दुर्देवानं ही वायर विसर्जन ट्रॉलीला लागली. यामुळे पाच जणांना विद्युत धक्का बसला.

यात एकाचा मृत्यू तर, चार जण जखमी असल्याची माहिती आहे. बिनू शिवकुमार (वय वर्ष ३६) असे मृत तरूणाचे नाव आहे. या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, तुषार गुप्ता (१८, धर्मराज गुप्ता (४४), आरुष गुप्ता (१२), शंभू कामी (२०), करण कानोजिया (१४) असे जखमी तरूणांची नावे आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट

शनिवारी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्सवानंतर मुंबईसह राज्यभरात विसर्जन मिरवणूक पार पडली. भक्ती भावाने गणरााला निरोप देण्यात आला. मात्र, मुंबईतील साकीनाका परिसरात गणपती विसर्जनाला गालबोट लागणारी घटना घडली. शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT