Mumbai Traffic Police Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Traffic Police : उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना महत्त्वाचे निर्देश

उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना महत्त्वाचे निर्देश

Satish Kengar

Cm Eknath Shinde On Maharashtra Traffic Police : दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेडस तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.

आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री शिंदे ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले.  (Latest Marathi News)

तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.

यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतुक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: 'वीकेंड का वार'मध्ये रंगला नवा ड्रामा, काझीमुळे भडकला सलमान खान; 'या' स्पर्धकाची केली चांगलीच कानउघाडणी

'मतचोरी नाही, यांचा मेंदूच चोरीला गेलाय!' फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात; PM मोदींकडे केली अजब मागणी...

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या चरणी 4 लाख 56 हजारांचा सोन्याचा ब्रोच अर्पण

Tea- Coffee Cups: चहा- कॉफी पिण्यासाठी वापरणारे कप आरोग्यासाठी घातक? ते कधी बदलावेत? जाणून घ्या

House Painting : सणासुदीत भाड्याचं घर रंगवायचंय? पैसे कोण देणार? मालक की भाडेकरू; 'हा' नियम वाचून धक्काच बसेल

SCROLL FOR NEXT